तारा सुतारीया करतेय या अभिनेत्याला  डेट?

1 min read

तारा सुतारीया करतेय या अभिनेत्याला डेट?

स्टुडण्ट ऑफ द इयर २ मधून बॉलिवूडमधून पदार्पण केलेली अभिनेत्री तारा सुतारीया बॉलिवूडमधील अभिनेत्याच्या प्रेमात अखंड बुडाल्याच्या चर्चा आहेत. या अभिनेत्याचं कपूर खानदानाशी सरळ नातं आहे. अभिनेता आदर जैनला तारा सुतारीया डेट करत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. आदर जैनने २०१७ मध्ये ‘कैदी बँड’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसं यश मिळालं नव्हतं.

आदरचा मोठा भाऊ अरमान जैनचं नुकतचं लग्न झालं. या लग्नामध्ये तारा आणि आदरला एकत्र पाहण्यात आलेय. त्यांनी एका गाण्यावर परफॉर्मही केला. परफॉर्मन्स करताना त्यांची केमेस्ट्री पाहून दोघांत काहीतरी शिजत असल्याचं बोललं जातेय. आदर आणि ताराला अनेक कार्यक्रमात एकत्र पाहण्यात आलं आहे. रणबीर कपूरची बहिण रिद्धिमा साहनीने एका व्हाट्सअप ग्रुपवर फॅमेली फोटो पोस्ट केला. त्यावर कॅप्शनमध्ये फॅमेली असं लिहलं होतं. त्या फोटोमध्ये तारा आणि आदर सोबत होते. त्यावेळी दोघांच्या नात्यावर शिक्काबोर्तम झालं.

मुंबई मिररला दिलेल्या एका मुलाखतीत आदरची आई रीमा जैन म्हणाली होती, ‘आमचा मुलगा जिच्यावर प्रेम करतो तिच्यावर आम्हीही प्रेम करतो.’ ज्यावेळी रीमाला आदरच्या लग्नाबाबत विचारलं तेव्हा ती म्हणाली, आदर अद्याप लग्नासाठी तयार नाही त्याचा सर्व फोकस करियरवर आहे.त्यामुळे तो जेव्हा लग्नासाठी तयार होईल तेव्हा पाहूयात.