ते दोघे समान गुणाचे समान धाग्याचे

1 min read

ते दोघे समान गुणाचे समान धाग्याचे

त्या दोघांना समान मार्क पडलीत.. ती दोघे चुलत भाऊ आणि मावस भाऊ देखील. म्हणजे दोघांच्या आई सख्या बहिणी, वाचा ही मजेशीर योगायोगाची कहाणी

बऱ्याच वेळा जुळ्या भावंडांनी एकसमान कामगिरी बजावून लोकांचे लक्ष वेधल्याच्या घटना आपण अनेकदा अनुभवल्या आहेत. पण चुलत भावंड किंवा मावस भावंडांनी सारखीच कामगिरी बजावण्याची घटना दुर्मिळच. आणि अशीच दुर्मिळ घटना लातुरात घड़लीय व विशेष म्हणजे यातली आणखी एक गंमत म्हणजे, दोघेही भावंड ही एकमेकांची सख्खी चुलत आणि त्याचवेळी सख्खी मावस भावंडही आहेत.

ही आगळी-वेगळी घटना आहे कुलकर्णी परिवारातली. लातूर-रेणापूर रस्त्यावर 'कामत हॉटेल'चे संचालक असलेले सख्खे बंधु व्यंकटेश कुलकर्णी व जगदीश कुलकर्णी. व्यंकटेश यांचा वरुण आणि जगदीश यांचा श्रीनिवास ही दोन मुले. दोघांत फार तर साडेतीन चार महिन्यांचा फरक. यात श्रीनिवास मोठा.

श्रीनिवास आणि वरुण हे दोघेही बसवण्णाप्पा वाले इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी. यंदा इयत्ता १० वी परिक्षेस बसले होते. आज निकाल लागला आणि दोघांनाही समसमान ९७.८० टक्के गुण मिळाले. आपण नेहमीच जुळ्या भावंडांनी समान गुण घेतल्याचे पाहतो. पण इथे सख्ख्या चुलत भावंडांनी समान गुणांचा लातूर पैटर्न निर्माण केला आहे.

श्रीनिवासची आई रेणुका व वरुणची आई वसुंधरा ह्या दोघी श्री रेणुकादेवी मंदिरचे मुख्य पुजारी वरेणापूरचे प्रख्यात याज्ञीकी ब्राह्मण श्री.नागेश (बापुदेव ) धर्माधिकारी यांच्या कन्या आणि पत्रकार श्रीकांत उर्फ राजू धर्माधिकारी यांच्या भगिनी. असून ह्या सख्ख्या बहिणी व्यतिरिक्त दोघी नात्याने पुढे सख्ख्या जावा झाल्या. म्हणजेच सख्खे भाऊ व्यंकटेशसोबत वसुंधरा आणि जगदीशसोबत रेणुका यांच्यासमवेत त्यांचा विवाह झाला आहे.

सख्ख्या भावांचा दोन सख्ख्या बहिणीसोबत विवाह झाल्याने दोघांचीही नाती जावा-जावात बदलले आणि मुलांची नाती एकाच वेळी चुलत आणि मावस भावंड अशी झाली.
Attachments area