शोष खड्डयांचे तांत्रिक मार्गदर्शन

हादगाव पावडे आणि निपाणी टाकळी या ग्रामपंचायतींना मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्यासह अधिकार्‍यांच्या पथकाने भेट

शोष खड्डयांचे तांत्रिक मार्गदर्शन

परभणी : माझ गाव सुंदर गाव उपक्रमांतर्गत ग्रामीण भागात उघड्यावरच्या सांडपाण्याचे आणि संसर्गजन्य रोगांचे नियोजन व्हावे म्हणून जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या संकल्पनेतून सध्या गावागावात शोषखड्डे करण्याची मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अशा गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी टाकसाळे ग्रामस्थांना तांत्रिक मार्गदर्शन करत आहेत.

आज सेलू तालुक्यातील हादगाव पावडे आणि निपाणी टाकळी या ग्रामपंचायतींना मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्यासह अधिकार्‍यांच्या पथकाने भेटी दिल्या. यावेळी गावात सुरू असलेल्या सार्वजनिक आणि वैयक्तिक शोष खड्डयांची पाहणी करून ते तांत्रिकदृष्ट्या कसे महत्वाचे आहेत, यामुळे गावातील संसर्गजन्य आजार कसे उद्भवणार नाहीत, रोगराई पसरणार नाही तसेच गावातील पाण्याची पातळी कशी वाढेल या बाबत मार्गदर्शन केले. त्याच बरोबर हदगाव येथील शाळेला भेट देऊन शिक्षकांनी लोकसहभागातून वृक्ष लागवड करावी, शाळेची गुणवत्ता वाढवावी म्हणून विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण द्यावे, त्यांच्या गणित आणि इंग्रजी सारख्या विषयावर प्रभुत्व मिळवून द्यावे आदीबाबत शिक्षकांना सूचना दिल्या.

यावेळी स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, गट विकास अधिकारी विष्णू मोरे, माजी सभापती पुरुषोत्तम पावडे, सहाय्यक गट विकास अधिकारी डी. एस. अहिरे, सरपंच पावडे, ग्रामसेविका शिवभगत, सर्व विभागाचे विस्ताराधिकारी, ग्रामसेवक, स्वच्छ भारत मिशन कक्षातील अधिकारी आदींची उपस्थिती होती.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.