तहसिलदार व पोलिस प्रशासनाच्या धाडीत नऊ बॉक्स देशी जप्त

निलंगा शहरातील अण्णाभाऊ साठे नगरातील घटना

तहसिलदार व पोलिस प्रशासनाच्या  धाडीत नऊ बॉक्स देशी जप्त

निलंगा: शहरातील अण्णाभाऊ साठे नगरात अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या दोन व्यक्तीच्या घरावर धाड टाकून टाकून तहसिलदार व पोलिस प्रशासन यांनी नऊ बाॕक्स देशी दारूचे जप्त केले असून दोन आरोपीवर निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की निलंगा शहरातील अण्णाभाऊ साठे नगर भागात सतिश निळकंठ सगर व सुभाष लक्ष्मण जाधव हे दोघे आपल्या राहत्या घरी अवैध देशी दारू विक्री करत असल्याची माहिती तहसिलदार गणेश जाधव व पोलिस प्रशासनाचे पोलिस निरिक्षक अनिल चोरमले यांना मिळताच त्यांनी तात्काळ ताफा घेऊन जाऊन दिनांक १७ रोजी दुपारी १२ वाजता सदरील अवैध रित्या देशी दारू विक्री करणाऱ्या दोन व्यक्तीच्या घरावर धाड टाकून ४५१ बाटल्या नऊ बाॕक्स देशी दारू ताब्यात घेतली आहे.व दोन्ही आरोपीवर अवैध दारू विक्री करणे व बाळगणे अंतर्गत निलंगा पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रणिता गायकवाड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपीना ताब्यात घेतले आहे.पुढील तपास सपोनि.प्रणिता गायकवाड व पोशि प्रणव काळे हे करत आहेत.

कोरोना काळात देखील शहरात असा अवैध देशी दारू साठा सापडल्याने अनेक प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेत.संपूर्ण शहरासह ग्रामीण भागात कोरोना बाधीत संख्या वाढत असताना देखील अवैध दारू विक्री करणारे मात्र चढ्या भावाने दारू विक्री करून आपले उखळ पांढरे करत आहेत.असे अनेक अवैध रित्या साठवून ठेवलेले दारूचे आड्डे आहेत त्यांच्यावरही धाड टाकून कडक कारवाई करावी अशी मागणी शहरातील सुजान नागरिक करत आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.