सहाय्यक पोलिस निरिक्षकाची सामाजिक बांधिलकी दवाखाना उभारणीसाठी दिले एक महिण्याचे वेतन

१ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून , सुधीर सूर्यवंशी यांनी एक महिन्याचा संपूर्ण पगार दवाखाना उभारणीच्या मदतीसाठी दिला

सहाय्यक पोलिस निरिक्षकाची सामाजिक बांधिलकी दवाखाना उभारणीसाठी दिले एक महिण्याचे वेतन

निलंगा: निलंगा तालुक्यातील माकणी येथील दवाखान्याच्या उभारणीसाठी सहायक पोलिस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी यांच्या कडून एक महिण्याचे वेतन

सध्या जगभरात कोरोना या आजाराने थैमान घातले असून सर्वत्र कोरोना रुग्णासाठी बेड मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणत हेळसांड होत आहे.सध्याचं कठीण काळ व येणाऱ्या काळात गावची व बाहेरून येणाऱ्या भाविक भक्तांची वाढती लोकसंख्या, लक्षात घेता प्रसिद्ध तीर्थक्षेत्र महणुण ओळख असलेल्या जाज्वल्य हनुमान देवस्थान समितीच्या वतीने नुकतेच मंदिर संस्थेच्या स्वतच्या मालकीच्या ठिकाणी एक एकर जागेवर निःशुल्क दवाखाना सुरू करण्याचा निर्णय महत्वकांक्षी निर्णय घेतला असून याच्या उभारणीसाठी दोन दिवसापूर्वी १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून माकणी थोर येथे उभे राहणाऱ्या ट्रस्टच्या दवाखाण्यासाठी सामाजिक संवेदनशीलता व भविष्यातील गरज पाहून औराद (शा.) पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष साह्यक पोलिस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी यांनी एक महिन्याचा संपूर्ण पगार दवाखाना उभारणीच्या मदतीसाठी देण्याचे ठरवले आहे त्यांच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.