वैद्यकिय आधिकारी निलंबन प्रकरणी तहसीलदार तोंडघशी पडणार, पालकमंत्र्याकडे तहसीलदारांची तक्रार

जिल्हाधिकारी यांना चुकीची माहीती पुरवली, प्रशासनाचा एकतर्फी निर्णय सामाजिक कार्यकर्ते, पक्षाचे पदाधिकारी, रूग्ण, निलंबनाच्या विरोधात

वैद्यकिय आधिकारी निलंबन प्रकरणी तहसीलदार तोंडघशी पडणार, पालकमंत्र्याकडे तहसीलदारांची तक्रार

निलंगा: येथील उपजिल्हा रुग्णालयातील जेष्ठ वैद्यकीय आधिकारी डॉ. दिनकर पाटील यांचे निलंबन प्रकरणी जिल्हाधिकारी यांना चुकीची माहीती पुरवल्याप्रकरणी निलंबन मागे घ्यावे म्हणून दबाव वाढत असून या प्रकरणी निलंग्याचे तहसीलदार तोंडघशी पडणार आहेत. शिवाय याबाबत सामाजिक कार्यकर्ते व विविध पक्षाच्या पदाधिकार्यानी थेट तहसीलदारांची पालकमंत्र्याकडे तक्रार केली आहे.

येथील उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे कार्यरत असलेले जेष्ठ वैद्यकिय अधिकारी डॉ.दिनकर पाटील हे गेल्या दिड वर्षभरापासून निलंगा उपजिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णावर उपचार करत असून त्यांचे कार्य हे अत्यंत चांगले आहे. आतापर्यंत त्यांनी शेकडो लोकांचे प्राण वाचवले आहेत. याबाबत त्यांच्या कामाचे कौतुक स्वतः मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, माजीमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी मागील काळात केले होते. मात्र अचानकपणे किरकोळ कारण पुढे करत षडयंत्र रचून त्यांच्यावर 26 एप्रिल रोजी कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांनी रूग्णाला लागणारी औषध खासगी मेडिकलवरून आणावयास लावल्याची तक्रार तहसीलदार गणेश जाधव यांच्याकडे केली होती. याबाबत तहसीलदार गणेश जाधव यांनी सूड भावनेने डॉ.दिनकर पाटील यांच्या विरोधात मेडीकलवर छापा टाकण्याचा आधिकार नसताना छापा टाकून कांही पावत्या जप्त केल्या होत्या याबाबत जिल्हाधिकारी यांना चुकीची माहीती पुरवत एकतर्फी अहवाल तयार करून जिल्हाधिकारी लातुर यांच्याकडे पाठवला होता. जिल्हाधिकारी लातुर यांनी दि.27 एप्रिल रोजी कसल्याही प्रकारची शहानिशा न करता व चौकशी व त्यांना नोटीस न देता त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी न देता निलंबनाची कारवाई केली ती अत्यंत चुकीची आहे. याबाबत समाज माध्यमावर अनेकांच्या प्रतिक्रिया डॉ.पाटील यांच्या बाजूने आहेत.

शिवाय सद्य परिस्थितीमध्ये निलंगा उपजिल्हा रुग्णालयात डॉ.पाटील यांच्यासारखे तज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने उपचार घेणाऱ्या रुग्णाच्या जीवितास गंभीर स्वरूपाचा धोका निर्माण झाला आहे. शिवाय अनेक नातेवाईकांनी पाटील यांनी उपचार करून दिवसरात्र कशी मेहनत घेऊन संवेदनाशील प्रसंगी रूग्णाचे प्राण वाचवले याबाबत सोशल मिडीया समोर येऊन खुलासा करीत आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्या निवेदनाचा विचार करून तात्काळ डॉ दिनकर पाटील यांचे निलंबन रद्द करून त्यांना पुन्हा सेवेत दाखल करून घ्यावे असे निवेदन वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आले आहे तर शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य लिंबनमहाराज रेशमे यांनीही जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून डॉ. दिनकर पाटील यांचे निलंबन रद्द करावे व त्वरीत कामावर घ्यावे अशी मागणी केली आहे. तर निलंगा येथील एक शिस्टमंडळाने पालकमंत्री अमित देशमुख यांची भेट घेऊन डॉ. दिनकर पाटील यांच्यावर जिल्हाधिकारी यांना चुकीची माहीती देवून निलंबन केले असून त्यांनी परभणी जिल्हा येथे सक्षम सेवा बजावली आहे. मेळघाट अशा दुर्गम भागातही त्यांनी वैद्यकीय अधिक्षक म्हणून सेवा बजावली आहे. त्यांचे निलंबन मागे घ्यावे अशी मागणी करीत तहसीलदार गणेश जाधव यांच्या कृत्याबाबत तक्रार केली आहे. त्यामुळे उपजिल्हा रूग्णालयातील डॉ. दिनकर पाटील यांच्या निलंबन प्रकरणी तहसीलदार तोंडघशी पडले आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.