मदिरा गृहे उघडली, मंदिरे त्वरित उघडी करा  देवणी भाजपाच्या वतीने आंदोलन....

1 min read

मदिरा गृहे उघडली, मंदिरे त्वरित उघडी करा देवणी भाजपाच्या वतीने आंदोलन....

महाविकास आघाडीचे निष्क्रीय सरकार विरोधात मंदिर उघडण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे हे महाराष्ट्र राज्याचे दुर्दैव आहे.

देवणी :- येथील ग्राम दैवत महादेव मंदीरात दार उघड उद्धवा दार उघड... दार उघड मंदिराचे दार उघड आंदोलन करण्यात आले.
महाविकास आघाडीचे निष्क्रीय सरकार विरोधात मंदिर उघडण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे हे महाराष्ट्र राज्याचे दुर्दैव आहे. राज्यभरात ‘मदिरालये’ उघडली आहेत, परंतु ‘मंदिरालये’ मात्र बंदिस्त आहेत. राम बंधनात व तळीराम अनिर्बंध अशी राज्याची विचित्र अवस्था करुन ठेवली आहे. याविरोधात व सर्व प्रार्थनास्थळे सुरु व्हावीत यासाठी देवणी येथील ग्रामदैवत श्री शंभू महादेव मंदीरात भाजपाने ‘मंदिरे उघड उद्धवा’ आंदोलन केले. यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष काशिनाथ गरिबे , जि.प.सदस्य रामचंद्र तिरुके, प्रंशात पाटील, नगराध्यक्ष वैजनाथ अष्टुरे ,उपसभापती शंकर पाटील , भाजयुमो तालुका अध्यक्ष रामलिंग शेरे, शहराध्यक्ष अट्टल धनूरे , जिल्हा उपाध्यक्ष मनोहर पटणे , भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष संगम पताळे , प्रंशात पाटील, बाळासाहेब बिरादार, रमेश मनसुरे, नगरसेवक मच्छीन्द्र नरवटे, नगरसेवक बाबुराव इंगोले, ओमभैया धनूरे,श्री बालाजी सुर्यंवशी, मयुर पटणे, राज गुणाले, विवेक पाटील, कोरे आदिसह
पदाधिकारी उपस्थित होते .