भयंकर..! औरंगाबादेत कोरोनाचा कहर, दिवसभरात आढळले १०२३ रुग्ण

काल दिवसभरात १०२३ कोरोनाबाधितांची भर, ५ कोरोना रुग्णांचा मृत्यु...

भयंकर..! औरंगाबादेत कोरोनाचा कहर, दिवसभरात आढळले १०२३ रुग्ण

सुमित दंडुके/औरंगाबाद : शहरात कोरोनाचा उद्रेक थांबण्याचे नाव घेत नाहीये. प्रशासनाने रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी रात्र संचारबंदी लागू केली होती पण त्याचा काहीही परिणाम न झाल्याने ११ मार्चपासून अंशतः लॉकडाऊन लागू केले आहे. तरीपण रुग्णसंख्या काही आटोक्यात येत नसल्याचे दिसत आहे.

गेल्या दोन दिवसात या आकडेवारीने १ हजार चा आकडा पार केला आहे. शहरात ७९३, तर ग्रामीण भागामध्ये २३० रुग्ण आढळले आहेत. तसेच, पाच जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे, एकूण बाधितांची संख्या ५७,७०१ झाली आहे. तसेच जिल्ह्यात रविवारी ३६४ बाधित (शहरः ३०९, ग्रामीणः ५५) हे करोनामुक्त झाल्याने आतापर्यंत ५१,३८१ बाधित हे करोनामुक्त झाले आणि सध्या ४,९८१ बाधितांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. औरंगाबादमध्ये पहिला रुग्ण आढळल्याच्या घटनेला आज (१५ मार्च) रोजी एक वर्ष पूर्ण होत असतानाच, दैनंदिन रुग्णसंख्येचा आकडा पुन्हा एक हजारांच्या पुढे गेला आहे. जिल्हा प्रशासनासाठी ही बाब चिंतेचा विषय ठरत आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.