ठाकरे सरकार बदल्या करण्यात व्यस्त – देवेंद्र फडणवीस

1 min read

ठाकरे सरकार बदल्या करण्यात व्यस्त – देवेंद्र फडणवीस

पत्रकार पांडूरंग रायकर यांचा वेळेवर अँबुलन्स मिळाली नाही म्हणून त्यांच पुण्यात निधन झालं. राज्यातील ठाकरे सरकार केवळ बदल्या करण्यात व्यस्त आहे, असा आरोपही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर केला आहे.

स्वप्नील कुमावत :कोरोना विषाणू प्रादुर्भावच्या मुद्यावरुन भाजप पुन्हा आक्रमक झाले आहे. पत्रकार पांडूरंग रायकर यांचा वेळेवर अँब्युलन्स मिळाली नाही म्हणून त्यांच पुण्यात निधन झालं.मात्र राज्यातील ठाकरे सरकार केवळ बदल्या करण्यात व्यस्त आहे, असा आरोपही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर केला आहे. कोरोनाबाबत सरकार गंभीर नाही, असा हल्लाबोलही त्यांनी केला. बदल्या केल्या नसत्या तरी चालले असते. सर्व मंत्री, प्रशासन बदल्यांमध्ये गुंतले आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.
दरम्यान, विरोधीपक्षनेते फडणवीस यांनी मुख्यमंत्र्याला पत्र लिहून राज्यातील कोरोना चाचण्या 42 टक्के वाढविण्यात आल्य. तर मुंबईत केवळ 14 टक्के चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. ते अजून वाढविण्याची गरज आहे.

देशात सरासरीपेक्षा अधिक प्रतिदिन प्रतिदशलक्ष चाचण्या करणा-या राज्यांमध्ये भारताच्या सरासरीच्यापेक्षाही महाराष्ट्र मागे असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. अलिकडेच झालेल्या उत्तर महाराष्ट्राच्या दौ-यासंदर्भात सुद्धा काही सूचना त्यांनी या पत्रातून केल्या आहेत.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस आज आणि उद्या पूर्व विदर्भातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. नागपूर, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे इथल्या नुकासानग्रस्त भागाची ते पाहणी करणार आहेत.