ठाकरे सरकार हे निजाम राजवटीच सरकार-माजी मंत्री,आ.संभाजी पाटील निलंगेकर

1 min read

ठाकरे सरकार हे निजाम राजवटीच सरकार-माजी मंत्री,आ.संभाजी पाटील निलंगेकर

राज्य शासनाच्या एकंदरीत कामाचा आढावा घेताना आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी ठाकरे सरकारची निजाम राजवटीशी तुलना केली आहे.

निलंगा/प्रतिनिधी: राज्य शासनाच्या एकंदरीत कामाचा आढावा घेताना आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी ठाकरे सरकारची निजाम राजवटीशी तुलना केली आहे.
मराठवाडा हा महाराष्ट्राचाच भाग आहे. शेतकऱ्यावर अन्याय करणारे परिपत्रक राज्य शासनाने काढले आहे. परंतु सध्याचे सरकार हे मराठवाड्यावर अन्याय करत आहे. मुंबईला वेगळा न्याय आणि मराठवाड्यातील जिल्ह्याला वेगळा अस का? सगळ्यांना समान न्याय देऊन शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी, अन्यथा आम्हाला वेगळ्या मार्गाने न्याय मागावा लागेल याची दखल घ्या असा इशाराही त्यांनी दिला.

मागील आठवड्यात अचानक मोठा पाऊस झाला व शेतकऱ्यांचे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. निलंगा मतदार संघातील देवणी तालुक्यात १२१% पाऊस झाला. तेथील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. निलंगा -शिरूर अनंतपाळ याही तालुक्यात नुकसान होऊन सोयाबीन उडीत ज्वारी यांची प्रचंड नुकसान झाले आहे. मार्च पासून आजपर्यंत कोरोना काळात राज्य शासनाच्या प्रत्येक सुचनेचे पालन आपण केले आहे, यापुढे केले जाणार नाही. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ नाही दिली. तर सरकार विरोधात रस्त्यावर उतरून न्याय देऊ असा त्यांनी इशारा दिला. राज्य शासन व लातूर जिल्ह्याचे पालकमंञी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सक्षम नाहीत मुख्यमंत्र्याला व पालकमंत्र्यांना शेतकऱ्यांविषयी जिव्हाळा नाही, असा आरोप त्यांनी केला.
मागील आठवड्यात लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी झाली. परंतु पालकमंत्री मात्र याकडे फिरकले सुध्दा नाहीत.

एनडीआर या राष्ट्रीय पिक विमा योजनेमध्ये पिकांना कोंब फुटून नुकसान होणे हा प्रकारच नाही. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन माहिती घेतली आहे. यावर काही उपाययोजना करता येतात का अशा सुचनाही केल्या आहेत. तर मतदार संघातील नुकसान झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले असून पंचनामे करणे चालू झाले आहेत. अशी माहिती माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिली.