ठाकरे सरकाचा मोठा निर्णय, दुकानांच्या वेळा चार तासांनी वाढवणार

आपण व्यापाऱ्यांच्या धमक्यांना घाबरत नसून जनतेच्या हिताची आपल्याला अधिक काळजी- मुख्यमंत्री

ठाकरे सरकाचा मोठा निर्णय, दुकानांच्या वेळा चार तासांनी वाढवणार

सांगली: राज्यात कोरोनाचा दुसऱ्या लाटेचा संसर्ग कमी होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार निर्बंध शिथिल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील दुकानांना रात्री ८ वाजेपर्यत परवानगी देण्यात येईल अशी घोषण यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे. ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. तिथेच ही परवानगी असेल. कोरोना रुग्ण संख्या अधिक असलेल्या ठिकाणी निर्बंध कायम असतील, असं मुख्यमंत्री म्हणाले. या संदर्भातील जीआर आज संध्याकाळी निघेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

धमक्यांना घाबरत नाही
दुकानांच्या वेळा वाढवल्या नाहीत, तर कायदा मोडून दुकानं सुरु ठेऊ, अशी भूमिका पुण्यासह राज्यातील काही व्यापारी संघटनांनी घेतली होती. त्यावर आपण व्यापाऱ्यांच्या धमक्यांना घाबरत नसून जनतेच्या हिताची आपल्याला अधिक काळजी असल्याचं ते म्हणाले. मात्र त्याचवेळी राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना कमी आहे, अशा जिल्ह्यांतील दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत सुरु ठेवायला परवानगी मिळणार असल्याचं ते म्हणाले.

अनियंत्रित विकासामुळे पूर
राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये अनियंत्रित विकास झाला आहे. त्यामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण होत असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. जिथं भेटी दिल्या आणि जिथं दिल्या नाही, त्या सर्व भागांना सारखीच मदत मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नदीच्या जवळ भिंती बांधण्याच्या आपल्या विधानाचा माध्यमांनी विपर्यास केल्याचं सांगताना ते माझं नव्हे, तर तज्ज्ञांचं मत असल्याचं आपण बोललो होतो, असं मुख्यमंत्री म्हणाले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.