मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

शिवसेना-भाजप युतीच्या चर्चांना उधाण

मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

औरंगाबाद : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या एका विधानमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरूवात करताना 'व्यासपीठावर बसलेल्या माझ्या आजी-माजी आणि भविष्यात एकत्र आले तर माझे भावी सहकारी' अशा शब्दात सुरुवात केली. यावेळी मुख्यमंत्र्यांचा रोख भाजपाचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या दिशेनं होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाची कार्यक्रमात जोरदार चर्चा सुरू झाली. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला आजी सहकारी म्हणजेच काँग्रेसचे नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात, माजी सहकारी म्हणून उपस्थित भाजपाचे नेते असा उल्लेख केल्यानंतर भविष्यात एकत्र जालो तर भावी सहकारी असे म्हणत त्यांनी भाजपा नेत्यांकडे पाहिलं, उद्धव ठाकरेंच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलं आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.