१०२ वर्षाच्या आजोबांनी घेतली कोरोना लस

पूर्णा तालुक्यातील भाटेगाव येथील वयोवृद्ध आजोबांनी लस घेण्यासाठी घाबरणार्‍या लोकांसमोर आदर्श निर्माण केला

१०२ वर्षाच्या आजोबांनी घेतली कोरोना लस

परभणी : पुर्णा तालुक्यातील कंठेश्वर प्रा.आ. केंद्रात भाटेगांव येथील कृषीप्रधान शेतकरी सखारामजी तुकारामजी कर्‍हाळे (१०२) यांनी सपत्नीक लस घेतली.

तालुक्यात कोरोना लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्यास सुरुवात झाली आहे.यामध्ये वयोवृद्ध गटातील नागरिकांनी लस टोचून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.पूर्णा तालुक्यातील भाटेगाव येथील वयोवृद्ध आजोबांनी लस घेण्यासाठी घाबरणार्‍या लोकांसमोर आदर्श निर्माण करत आज कंठेश्वर प्रा.आ. केंद्रात जाऊन लस घेतली. यावेळी त्यांच्यासह त्यांच्या पत्नी कमलबाई कर्‍हाळे (८७) याही उपस्थित होत्या. तर त्यांचे बंधू विश्वंभर कर्‍हाळे (९५) व भावजय जानकाबाई कर्‍हाळे (८५) यांनीही परिचारीका एल.बी. खोडके, मल्लेखा पठाण यांच्या हस्ते लस टोचून घेतली. यावेळी जि.प. चे माजी आरोग्य सभापती दिगंबरराव कर्‍हाळे, सामाजिक कार्यकर्ते कल्याण कर्‍हाळे, डॉ.माजीद खान, पं.स.चे विस्तार अधिकारी नरवाडे आदींची उपस्थिती होती.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.