वैद्यकीय आधिकाऱ्यांचा सल्ला रूग्णाच्या खिशावर डल्ला

तहसिलदाराने महाजन मेडिकलवर टाकला छापा

वैद्यकीय आधिकाऱ्यांचा  सल्ला रूग्णाच्या खिशावर डल्ला

निलंगाः निलंगा येथील उपजिल्हा रूग्णालयात कोरोना रूग्णांवर उपचारासाठी नातेवाईकांना बाहेरून औषधी आणण्याची वैद्यकीय अधिकाऱ्याची सक्ती केल्याचे निष्पन्न झाले असून भरमसाठ औषध असतानाही खासगी मेडीकल मधून औषध आणण्यास भाग पाडले जात असाल्याने अशा गंभीर संकटाच्या काळात रूग्णाच्या खिशावर डल्ला मारला जात आहे.

सध्या कोरोनामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असून अनेक लोकांना वेळेवर उपचार व औषधी न मिळाल्याने त्याना आपला जीव गमवावा लागत आहे. सरकारी दवाखान्यात रूग्णाची औषधा अभावी हेळसांड होऊ नये म्हणून राज्य शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे.उपजिल्हा रूग्णालयात कोरोनावर इलाज करणारी भरमसाठ औषधी असताना देखील येथील वैद्यकीय अधिकारी डॉ दिनकर पाटील हे शहरातील खासगी महाजन मेडिकल मधील औषधी घेऊन या म्हणून सक्ती करत आहेत व त्यांना त्या मेडिकलच्या नावे पावत्या देऊन औषध मागवून घेत असल्याचे एका महिलेने तहसिलदार गणेश जाधव यांच्याकडे तक्रार केली.तात्काळ कर्तव्यदक्ष तहसिलदार यानी उपजिल्हा रूग्णालय गाठले व सदरील बाबीची चौकशी केली असता कोरोनावर उपचार करणारे औषध सदरील रूग्णालयात असताना संबंधित वैद्यकीय अधिकारी श्री. पाटील खाजगी मेडिकल मधील औषधी का मागवून घेतात याबाबत तपास केला असता संबंधित वैद्यकीय अधिकारी व महाजन मेडिकल यांची मिलीभगत असल्याचे निष्पन्न झाले आहे.सरकारी दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ दिनकर पाटील व त्यांच्या पत्नी या महाजन मेडिकल असलेल्या दुसऱ्या मजल्यावर खाजगी दवाखाना चालवत असतात त्यामुळेच ते खाजगी मेडिकल मधून औषधी आणण्यासाठी सक्ती करत आसल्याचे सांगितले जात आहे.तालुक्यातील एका महिलेच्या पतीचे काही दिवसापूर्वी कोरोनामुळे निधन झाले आहे.सदरील महिलेच्या वडीलांना पण कोरोनाची बाधा झाल्याने त्याना उपजिल्हा रूग्णालय निलंगा येथे दाखल केले असता संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याने १३ हजार पाचशे रूपयांची औषधी शहरातील महाजन मेडिकल मधून आणण्यासाठी पावती दिली व ती औषध त्यानी घेऊनही आले.संबंधित महिलेकडे पुन्हा लिहून दिलेली औषध आणण्यासाठी पैसे नसल्यामुळे त्या महिलेने थेट तहसिलदार गणेश जाधव यांच्या कडे धाव घेतली व आपले म्हणणे सांगितले.त्यानंतर तात्काळ तहसिलदार यांनी छापा टाकला असता ९०% रूग्णांणा खाजगी मेडिकल मधून औषध आणायला लावल्याचे निष्पन्न झाले आहे.सदरील वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई करावी असा अहवाल जिल्हा अधिकारी यांच्याकडे पाठविले असल्याची माहिती खुद्द तहसिलदार यांनी दिली आहे.

याबाबत संबंधित वैद्यकीय अधिकारी डॉ दिनकर पाटील यांना संपर्क केला असता ते म्हणाले माझा या प्रकरणाशी काहीच संबध नाही जाणीवपूर्वक यात मला गोवले जात असल्याची माहिती त्यानी दिली.मी गेल्या अनेक दिवासापासून कोरोना बाधीत रूग्णांची सेवा करत आहे.काही रूग्णांची नातेवाईक आम्हिला बाहेरची औषध लिहून द्या पण आमचा रूग्ण वाचला पाहिजे अशी विनंती केल्यानंतर मी लिहून दिले आहे असे संपर्क साधला सांगितले


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.