फडणवीसांनी केलेल्या आरोपाचा देशमुखांनी केला खुलासा

१५ फेब्रुवारीला सुरक्षारक्षकांसह, माध्यम प्रतिनिधींसमोर अशी पत्रकारपरिषद मात्र झाली होती. मग हे नेमके कोण?- फडणवीस

फडणवीसांनी केलेल्या आरोपाचा देशमुखांनी केला खुलासा

मुंबईः मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100कोटी रुपयांची वसुली करण्याचे टार्गेट सचिन वाझे यांना दिले होते, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला. सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्यात बैठक झाली असल्याचा दावाच चुकीचा असल्याचे पवार यांनी म्हटले.

सचिन वाजे आणि अनिल देशमुख यांची भेट झाली हा द्वा खोटा असल्याच शरद पवार म्हणाले. आयुक्तांनी फेब्रुवारीच्या मध्यात वसुलीच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले. माझ्याकडे जी कागदपत्रे आहेत त्यानुसार 5 ते 15 फेब्रुवारी अनिल देशमुख हे कोरोनामुळे रुग्णालयात भरती होते. नागपूरमधील रुग्णालयाकडून काही कागदपत्र मिळवली आहेत, त्या रुग्णालयाने सर्टिफिकेट दिले आहे. अनिल देशमुख हे 17 दिवस भरती होते. आज हातात आल्याल्या माहितीवरून देशमुखांविरोधात केलेल्या आरोपात तथ्य नाही, त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख राजीनामा देणार नसल्याचं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पवारांची पत्रकार परिषद संपताच फडणवीस यांनी दोन ट्वीट केले आहेत.१५ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाइन होते, असे पवार साहेब सांगतात. पण १५ फेब्रुवारीला सुरक्षारक्षकांसह, माध्यम प्रतिनिधींसमोर अशी पत्रकारपरिषद मात्र झाली होती. मग हे नेमके कोण?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

अनिल देशमुख यांनी स्वताः देवेंद्र फडणवीसानी केलेल्या आरोपाचे खुलासा केला.कोविडची लागण झाल्यामुळे ५ ते १५ फेब्रुवारी दरम्यान मी अॅलेक्सिक रुग्णालयात होतो. तिथून १५ फेब्रुवारीला डिस्चार्ज झाला तेव्हा हॉस्पिटलच्या गेटवर अनेक पत्रकार उभे होते. त्यांना काही प्रश्न विचारायचे होते. नुकताच कोविडमधून बाहेर पडल्यामुळे माझ्या अंगात त्राण नव्हता. त्यामुळे गेटवरच खुर्चीवर बसलो आणि काही पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यानंतर मी होम क्वारंटाइन झालो. १५ ते २७ फेब्रुवारी पर्यंत मी होम क्वारंटाइन होतो. २८ फेब्रुवारीला पहिल्यांदा घराबाहेर आलो असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांबाबत संभ्रम कायम आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.