सहाय्यक पोलिस निरीक्षकच जातीयवादी

1 min read

सहाय्यक पोलिस निरीक्षकच जातीयवादी

वंचित बहुजन आघाडीचे निवेदन त्या अधिका-यांला तात्काळ निलंबित करा

सिध्देश्वर गिरी/परभणी: पाथरीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी तिप्पलवाड हे जातीयवादी वृत्तीचे असून त्यांना तात्काळ निलंबित करत न्याय देण्याची मागणी एका निवेदनाद्वारे सोनपेठ तहसीलदारांकडे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की,पाथरी पोलिस स्थानकांतर्गत गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या व अवैध व्यवसायांना खतपाणी घालणाऱ्या तिप्पलवाड यांनी दलित समाजाबद्दल अपशब्द वापरून दलितांचा अवमान केला आहे. दि.३ ऑगस्ट रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेहमी लावली जात असणारी संचारबंदी हटवा अशी मागणी असणारे निवेदन घेऊन गेलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना जातीविषयक शब्द वापरून अवमानित करत तुमचे निवेदन घेत नसतो म्हणून परत पाठवले. लोकशाहीमध्ये तिप्पलवाड यांनी हुकुमशाहीचा वापर केला. यामुळे समाजाच्या भावना दुःखावल्या असून जातीयवादी सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी तिप्पलवाड यांना निलंबित करावे अशी मागणी नमूद करण्यात आली आहे. निवेदनावर जेष्ठ नेते कचरुबा मुंडे,तालुकाध्यक्ष हनुमान पंडीत,माजी तालुकाध्यक्ष रामेश्वर पंडीत,शहराध्यक्ष सुशिल सोनवणे,रईस कुरेशी,बाळू वाघमारे,कडाजी तिरमले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.