प्लास्टर ऑफ पॅरीस वरील बंदी उठवावी, मुर्तिकारांनी घेतली राज ठाकरेंची भेट.

1 min read

प्लास्टर ऑफ पॅरीस वरील बंदी उठवावी, मुर्तिकारांनी घेतली राज ठाकरेंची भेट.

राज ठाकरे यांनी पर्यावरण पुरक मूर्ती तयार करा असा सल्ला मूर्तिकारांना दिला.

मुंबई : केंद्र सरकारने प्लास्टर ऑफ पॅरीस (POP) वापरण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे मूर्ती घडवणं मूर्तिकारांना कठीण झालं आहे. या पार्श्वभूमीवर ही बंदी उठवावी, अशा विविध मागण्यांचे निवदेन घेऊन मूर्तिकारांचं शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतलीे. राज ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजवर ही भेट व चर्चा  झाली .

केंद्र सरकारने प्लास्टर ऑफ पॅरीस (POP) वापरण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे मूर्ती घडवणं मूर्तिकारांना कठीण झालं आहे. या पार्श्वभूमीवर ही बंदी उठवावी, या मागणीसाठी पेणमधील मूर्तिकारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली.यावेळी राज ठाकरे यांनी पर्यावरण पुरक मूर्ती तयार करा असा सल्ला मूर्तिकारांना दिला.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अनलॉक सुरु आहे. त्यानुसार अनेक व्यावसायिक कृष्णकुंजवर येऊन राज ठाकरेंची भेट घेत आहे. काही दिवसांपूर्वी डोंगरी येथील कोळी महिलांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. डोंगरी मार्केटमध्ये बेकायदा मासेविक्रेत्यांनी अतिक्रमण केलं असून हे अतिक्रमण हटवण्याची मागणी या महिलांनी राज ठाकरे यांच्यापुढे मांडली होती.