भाजप आमदाराने वीज कंपनीच्या अभियंत्याला दोरीने बांधत घातला चपलाचा हार

मी शेतकऱ्याचा मुलगा.. आमदार मिरविण्यासाठी झालो नाही तर सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी झालो- आ.मंगेश चव्हाण

भाजप आमदाराने वीज कंपनीच्या अभियंत्याला दोरीने बांधत घातला चपलाचा हार

जळगाव: शेतकऱ्यांची वीज तोडल्या प्रकरणी चाळीसगाव भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी जळगावमध्ये राडा करत वीज कंपनीच्या अभियंत्याला दोरीने बांघून चपलाचा हार घातला.(The BJP MLA tied the power company's engineer with a rope and put on a slipper necklace0 चाळीसगावचे भाजपा आमदार मंगेश चव्हाण हे आपल्या समर्थकांसह वीज कंपनी अभियंत्याच्या कार्यालयात पोहोचले होते. चाळीसगाव तालुक्यातील ७ हजार शेतीपंप कनेक्शन तोडण्यात आली आहेत. हाच मुद्दा घेऊन त्यांनी वीज तोडणीचा जाब विचारला असता. दरम्यान यावेळी धक्काबुक्की करण्यासह अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडल्याने आमदार चव्हा यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मंगेश चव्हाण यांना अटक करण्यात आलं.

शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा यासाठी चव्हाण यांनी अनेकदा अधिक्षक अभियंता यांना लेखी सूचना केल्या मात्र त्यांची दखल घेतली गेली नाही. चालू तीन महिन्यांचे बिल भरण्याचे कारण सांगून शेतकऱ्यांच्या वीज जोडणी तोडण्यात आली, जेव्हा शेतकरी बिल भरायला गेले तेव्हा मात्र मागील १० वर्षाची थकबाकी भरा म्हणून अधिकारी सांगतात. मागील २ वर्षांपासून शेतकऱ्यांना उत्पन्न नाही त्यात यावर्षी गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे पीक जमीनदोस्त झाले. त्यात वीज कनेक्शन कट केल्याने काढणीसाठी आलेल्या पिकांना पाणी देता येत नाही, जनावरांना प्यायला पाणी नाही. अशी सर्व विदारक परिस्थिती असताना मी एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून शांत राहणे शक्य नव्हते. मी आमदार मिरविण्यासाठी नाही तर शेतकऱ्यांचे व सर्वसामान्यांचे अश्रू पुसण्यासाठी झालो आहे. अशी प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली.

विविध संकटांच्या जोखडात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या कथा आणि व्यथा मांडण्यासाठी आज वीज वितरण कंपनीचा व महाविकास आघाडी सरकारचा निषेध म्हणून जळगावचे अधिक्षक अभियंता यांना चपलांचा हार घालून त्यांना दोरीने बांधले. शेतकऱ्यांची वीज तोडणी तात्काळ थांबविण्यात यावी व तालुक्यातील ७ हजार शेतीपंप कनेक्शन तात्काळ जोडावी अशी आमची मागणी आहे अन्यथा मला लोकप्रतिनिधी या नात्याने तीव्र स्वरूपाचे आंदोलन शेतकऱ्यांना सोबत घेऊन करावे लागेल असा इशारा आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.