८ ते १० दिवस फ्लॅटमध्ये वृद्ध दाम्पत्याचा मृतदेह होता पडून, असे आले उघडकीस...

मुलीला अमेरीकेहुन येणे शक्य नव्हते आणि नातेवाईकही जवळ नसल्याने पोलीसांनी सामाजीक कार्यकर्त्यांच्या मदतीने केला अंत्यसंस्कार.

८ ते १० दिवस फ्लॅटमध्ये वृद्ध दाम्पत्याचा मृतदेह होता पडून, असे आले उघडकीस...

सुमित दंडुके/औरंगाबाद : पत्नीला पॅरालिसीस आणि पतीला सोरायसिस आजार, एक मुलगी ती अमेरीकेला, पॅरालिसीस असल्याने पत्नी एका जागेवर पडून असायची. तिचे सर्व वृद्ध पतीच करत असे. विजय मेहंदळे (वय.७०) आणि माधुरी विजय मेहंदळे (वय.६५, रा.पदमपुरा) असे या वृद्ध दाम्पत्याचे नाव. घरात काही औषधी, दुध, ब्रेड लागले तर आठ-दहा दिवसाला फोन करुन घरी मागवुन घ्यायचे. मुलगी अमेरीकेला असल्याने तीची कधीतरी चक्कर व्हायची. ती गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात औरंगाबादला आली, तेव्हा घर स्वत:च्या नावावर करुन परत गेली. बरेच दिवस झाले यांचे घर शांत दिसत होते. त्यानंतर फ्लॅटमधुन दुर्गंधी यायला लागल्याने शेजारच्यांना संशय आला. त्यांंनी तात्काळ याची माहिती वेदांतनगर पोलीसांना दिली. पोलीसांनी सुताराच्या मदतीने दरवाजा तोडुन आत प्रवेश केला तर दोघेही मृतावस्थेत पडून होते. महेश यांचा मृतदेह कुजला होता तर माधुरी यांचा मृतदेह कुजायला सुरुवात झाली होती. त्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरलेली.
वृद्ध दाम्पत्याच्या अचानक झालेल्या मृत्युने परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती. दोघांच्याही मृत्युचे कारण नेमके स्पष्ट नसल्याने त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटीत हलविण्यात आले.

**मुलगी असुनही पोलीसांना करावे लागले अंत्यसंस्कार **

मृत मेहंदळे दाम्पत्याचा अंत्यसंस्कार करण्यासाठी जवळ एकही नातेवाईक नव्हते. मुलगी अमेरीकेत होती, तिचे येण शक्य नसल्याचे तिने पोलीसांना सांगितले. त्यामुळे पोलीसांनी सामाजीक कार्यकर्त्यांच्या मदतीने अंत्यसंस्कार केला.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.