१८ दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा आढळला मृतदेह

१७ डिसेम्बर रोजी मुलाला भेटण्यासाठी चिकलठाण्याकडे गेलेल्या ८५ वर्षीय वृद्धाचा मृतदेह, काल दि.०३ रोजी चिकलठाणा परिसरातील पुलाखाली चिखलात रुतलेल्या अवस्थेत आढळला.

१८ दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा आढळला मृतदेह

सुमित दंडुके / औरंगाबाद : संजयनगर मुकुंदवाडी येथील दशरथ भागाजी देहाडे (वय.८५) हे १७ डिसेंबर रोजी घरात कोणालाही न सांगता चिकलठाणा परिसरात राहणाऱ्या मुलाला भेटण्यासाठी गेले होते. घरी परत न आल्याने घरच्यांनी त्यांचा शोध सुरु केला. पण ते कुठेही सापडले नसल्याने घरच्यांनी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
काल दि.०३ जानेवारी रोजी चिकलठाणा परिसरातील पुलाखालील चिखलात एक मृतदेह नागरिकांना आढळला, याची माहिती एमआयडीसी सिडको पोलिसांना देण्यात आली. मृतदेह कुजलेला असल्यामुळे याची ओळख पटने अवघड झाले होते. तसेच बऱ्याच दिवसांपासून मृतदेह चिखलात फसलेला असल्यामुळे त्याला बाहेर काढतानाही पोलिसांची आणि नागरिकांची चांगलीच तारांबळ झाली.

कुजलेल्या मृतदेहाची ओळख पटणेही शक्य नव्हते. अखेर मृताच्या मुलाने आणि नातेवाईकांनी विडी आणि डोक्यावरील फेटा याच्यावरून मृतदेहाची ओळख पटविली. संध्याकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घरच्यांकडे सोपविण्यात आला. शौचास गेले असताना चिखलात रुतल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.