निलंग्यातील भुतमुगळी शिवारात आढळले अज्ञात व्यक्तीचे प्रेत

ठार मारून प्रेत आणून टाकल्याचा संशय,सोशल मिडीयावर फोटो टाकल्यावर पटली ओळख

निलंग्यातील भुतमुगळी शिवारात आढळले अज्ञात व्यक्तीचे प्रेत

माधव पिटले/ निलंगा : निलंगा तालुक्यातील भुतमुगळी शिवारात एका अज्ञात व्यक्तीचे प्रेत आढळून आले आहे. सदरील व्यक्ती खंडू ज्ञानदेव मदने, वय ३५ वर्षे उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील बोरी मातोळा येथील रहिवासी आहेत. या घटनेने बोरी मातोळा येथे एकच खळबळ उडाली आहे.

मृत व्यक्तीच्या अंगावर मारल्याच्या खुना आढळल्या आहेत. तर त्यांना ठार मारल्याचा संशय ही व्यक्त केला जात आहे. दि. ५ रोजी ते घरच्या लोकांना मी शेताकडे जात आहे असे सांगुन ते गेले. दि. ६ रोजी सकाळी सदरील व्यक्तीचे प्रेत निलंगा तालुक्यातील भुतमुगळी शिवारात सापडले. कासार शिरसी पोलिसांना याची माहिती मिळताच. त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. परंतु प्रेताच्या जवळ कोणताही पुरावा मिळाला नसल्याने त्यांचा फोटो सोशल मिडियावर टाकण्यात आला. तेव्हा सदरील व्यक्ती हा उमरगा तालुक्यातील बोरी मातोळा येथील असल्याची माहिती मिळाली.

मृत व्यक्तीला कासार शिरसी येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून प्रेत अंत्यसंस्कारासाठी ताब्यात देण्यात आले. पुढील तपास कासार शिरसी पोलिस ठाण्याचे
पोलिस निरीक्षक रेवाननाथ ढमाळे हे करत आहेत. मृताच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परीवार आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.