पुराच्या पाण्यामुळे बसपूर बाकली मांजरा नदीवरील पूल खचला

दोन तालुक्याला जोडणारा रस्त्याची दैनिय अवस्था

पुराच्या पाण्यामुळे बसपूर बाकली मांजरा नदीवरील पूल खचला

निलंगा : निलंगा ते शिरूर अनंतपाळ तालुक्याला जोडणारा मांजरा नदी वरील बसपूर-बाकली हा पूल चार दिवसांपूर्वी आलेल्या पुरात संपूर्ण खचला असून आता या पुलावरून वाहतूक करणे बंद आहे. त्यामुळे येथून जाणारी वाहतुक खोळंबली आहे.

याबाबतची माहीती अशी की, मांजरा नदीवरील बसपूर-बाकली वाहतुकीसाठी असलेल्या पुलावरून (ब्रीज) पुराच्या पाण्यामुळे खचला असतानाही काही लोक यावरून वाहतूक करत असून त्यांच्या जीविताला कधीही धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या पुलाची दुरुस्ती तातडीने करावी अशी मागणी दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी केली.

दोन तालुक्याला जोडणारा हा पूल असून वाहतुकीसाठी अत्यंत गरजेचा असून उदगीर किंबहूना पुढे जाण्यासाठी सर्वात नजीकचा हाच मार्ग असल्याचे परिसरातील नागरिक बोलून दाखवत आहेत. तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व मांजरा धरणाची दार अचानकच खुली केल्यामुळे पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणामध्ये आला या पुरामध्ये शेतीचे अतोनात नुकसान झाले त्याच सोबत रस्ते वाहून गेले व संपूर्ण पूल उखडला आहे. केळगाव ,बसपूर, खडक उमरगा, बाकली, राणी अंकुलगा येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, व्यापारासाठी एकमेव सोयीचा मार्ग असून नागरिकांसह विद्यार्थी व व्यापार यांची मोठी अडचण होत आहे. २००७ मध्ये तयार झालेला पुलावर एवढ्या लवकर खड्डे पडून सळ्या उघड्या पडल्यामुळे संबंधित कामाची चौकशी करून कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी या वेळी केली.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.