साप चावल्याने म्हशीचा जागीच मृत्यू

नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तात्काळ शासनाने आर्थिक मदत करावी

साप चावल्याने म्हशीचा जागीच मृत्यू

निलंगाः तालुक्यातील शेळगी येथील शेतकरी सुभाष तुकाराम बिराजदार यांची म्हशीला साप चावल्याने तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

तालुक्यातील शेळगी येथील शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरासमोर रस्त्याच्या कडेला म्हैस बांधली होती. बांधल्या ठिकाणी सदरील म्हशीला साप चावल्याने तीचा जागीच मृत्यू झाला आहे.सदरील शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून घटना स्थळावर पशुवैद्यकीय अधिकारी एस. एल. चव्हाण , तलाठी सुरेश क्षिरसागर,यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मयत म्हशीचे शेवविच्छेदन केले असता साप चावूनच मृत्यू झाल्याचे पशु वैद्यकीय अधिकारी चव्हाण निष्पन्न झाले असल्याचे सांगितले.

सरपंच बंकट बिराजदार यानी सदरील शेतकरी हा दुध विकून आपले कुटुंब चालवित असे यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तात्काळ शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी केली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.