सीईओंनी घातला गावात स्वच्छतेचा जागर

जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचार्यांनी रात्रीच्या वेळी गावांमध्ये जाऊन स्वच्छतेबाबत जनजागृती केली.

सीईओंनी घातला गावात स्वच्छतेचा जागर

विजय कुलकर्णी /परभणी : ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे आणि त्यांनी शौचालयाचा नियमित वापर करावा म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे गावागावात फिरून स्वच्छतेचा जागर घालत आहेत. १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून परभणी तालुक्यातील सायाळा खटींग या ग्रामपंचायतीमध्ये जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचार्यांनी रात्रीच्या वेळी गावांमध्ये जाऊन स्वच्छतेबाबत जनजागृती केली.

यावेळी जि.प.चे अतिरिक्त सीईओ विजय मुळीक, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता गंगाधर यंबडवार, माविमच्या जिल्हा समन्वयक नीता अंभोरे, वासो मुंबईचे विभागीय समन्वयक अरुण रसाळ, सरपंच वच्छलाबाई काळे, उपसरपंच लक्ष्मण खटिंग, ग्रामसेवक चंद्रमुनी चावरे यांच्यासह शाळेतील शिक्षक, आशाताई अंगणवाडी ताई, महिला बचत गटाच्या सदस्य आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती. सीईओ टाकसाळे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील नागरिकांनी शौचालय बांधकाम आणि त्याच्या वापराबद्दल मानसिकता बदलणे गरजेचे आहे. उघड्यावरच्या हागणदारी व अस्वच्छतेमुळे माणसांचे आरोग्यमान खालावत आहे. तसेच जिजाऊंच्या लेकींनी चांगल्या आरोग्यासाठी शौचालयाचा वापर करणे महत्त्वाचे आहे. गावातील सुशिक्षित आणि तरुण युवकांनी समोर येऊन गाव हागणदारी मुक्त आणि स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही यावेळी टाकसाळे यांनी केले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.