सीईओंनी दिल्या जिल्ह्यातील सर्व कोविड सेंटरला भेटी

गैरसोयीबाबत तहसीलदार व मनपा आयुक्तांना दिल्या सूचना.

सीईओंनी दिल्या जिल्ह्यातील सर्व कोविड सेंटरला भेटी

परभणी : जिल्ह्यातील कोविड-१९ च्या प्रादुर्भावाने बाधित झालेल्या रुग्णांना औषधोपचार, जेवण व्यवस्था व आरोग्य विषयक सुविधा वेळेत मिळत आहेत का? याची खात्री करण्यासाठी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी सोमवार रोजी आयटीआय कोविड सेंटरला भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला.

भेटी दरम्यान टाकसाळे यांनी प्रत्यक्ष रुग्णांच्या कक्षामध्ये प्रवेश करुन प्रत्येक रुग्णास त्यांच्या तब्येतीची तसेच त्यांच्या अडचणींची व्यक्तिशः विचारपुस केली. असुविधांबाबतही विचारणा केली. आहारामध्ये मिळणाऱ्या जेवणाचा दर्जा व इतर आवश्यक सुविधाची माहिती प्रत्यक्ष रुग्णांकडुन घेतली. यावेळी त्यांच्यासोबत डॉ.कदम व आयटीआय केंद्रातील अधिपरिचारीका, वार्डबॉय, सफाईगार यांना दक्षता घेण्याच्या सुचना दिल्या.

कर्मचाऱ्यांच्या अडचणीसंदर्भात संपर्क साधण्याचे आवाहनही केले. यानंतर अक्षदा मंगल कार्यालयातील कोविड सेंटरलाही भेट दिली. यावेळी त्या ठिकाणी सुविधेचा अभाव असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी मनपा आयुक्त रमेश पवार व तहसीलदार बिराजदार यांना संपर्क साधुन कर्मचारी व रुग्णांना आवश्यक असणा-या सुविधा तात्काळ पुरविण्याबाबत सुचना केल्या.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.