मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री माझ्यावर पाळत ठेऊन आहेत- नाना पटोले

नाना पटोलेंच्या खळबळजनक विधानांनी महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता...

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री माझ्यावर पाळत ठेऊन आहेत- नाना पटोले

मुंबई: कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खळबळजनक विधान केले आहे. पटोले यांनी स्वबळाचा नारा देत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. स्वबळाच्या घोषणेमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. लोणावळा येथील कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी तयारीला लागण्याचे आदेश दिले आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्यावर पाळत ठेऊन असल्याचा आरोपही पटोले यांनी यावेळी केला. 'महाराष्ट्र ही कॉंग्रेसची भूमी आहे, तिथं आपल्याला सत्ता आणायची आहे. मी सोनिया गांधींना तसं आश्वासन देऊन आलो आहे. पण हे आपल्याला सुखाने जगू देणार नाही, त्यांच्याकडे गृहखातं आहे, मुख्यमंत्रीपद आहे. ते सत्तेत आपल्याबरोबर आहे, पण हे खाते त्यांच्याकडे आहे. महाराष्ट्रात कॉंग्रेस मोठी होत आहे हे त्यांना दिसतय. आता मी इथे आहे याचा रिपोर्ट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहखात्याला देण्याचे आदेश आहे. मी कुठे काय करतो याची सर्व माहिती त्यांना असते.' असे पटोले म्हणाले आहे.

तसेच ‘स्वबळावर लढू, असे स्पष्ट करत स्वबळाची भाषा मी केली तर त्रास होतो, आणि ‘ते’ बोलले तर ठीक, असा अप्रत्यक्ष टोला शिवसेनेला लगावत कार्यकर्त्यांनी कामाला लागावे,’’ असे आवाहन नाना पटोले यांनी केलं आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.