मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर देत केल्या मोठ्या घोषणा

मराठवाड्यासाठी ८ मोठ्या घोषणा

मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर देत केल्या मोठ्या घोषणा

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद दौऱ्यात मराठवाड्यासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांना राज्यातील जनतेच्या वतीने अभिवादन केल्यानंतर भाषण करताना त्यांनी मराठवाड्यासाठी संतपीठाची घोषणा केली. तसंच निजामकालीन १५० शाळांचा पुनर्विकास करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. मराठवाड्यासाठी योजनांचा पाढा वाचवून दाखवत मुख्यमंत्र्यांनी एमआयएमला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.

मुख्यमंत्री म्हणाले, 'आज ज्याने ज्याने मला धन्यवाद म्हणून बोर्ड दाखवले, त्यांना मला सांगायचं आहे की आमचा विकास आता सुरु झाला आहे, आणि अजून खूप होणार आहे. बोलघेवडे सरकार काही कामाचं नसतं', अशा कानपिचक्या मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावल्या.

मुख्यमंत्र्यांनी कोणकोणत्या घोषणा केल्या?
– मराठवाड्यासाठी संतपीठाची घोषणा
– निजामकालीन १५० शाळांचा पुनर्विकास करणार
– औरंगाबाद आणि अहमदनगर रेल्वेने जोडण्याचं मुख्यमंत्र्यांचं रेल्वे राज्यमंत्र्यांना आवाहन
– औरंगाबाद आणि शिर्डी विमानसेवा सुरु करण्याची संकल्पना
– मराठवाड्यासाठी २०० मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प उभारणार
– घृष्णेश्वर सभामंडप
– औरंगाबादचे पर्यटन समृद्ध करणार
– परभणीत शासकीय महाविद्यालय

सकाळी ९ वाजता मुख्यमंत्र्यांनी सिद्धार्थ उद्यान येथे स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन मुक्तीसंग्रामातील हुताम्यांना अभिवादन केलं. त्यानंतर त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.