रुग्णवाहिकेच्या ढिसाळ नियोजनाने बालक दगावला

१०८ या रुग्णवाहिकेवर नियंत्रण कोणाचे?

रुग्णवाहिकेच्या ढिसाळ नियोजनाने बालक दगावला

सोनपेठः ज्या ठिकाणी रुग्णांना बरे करण्यासाठी रुग्णवाहिका कार्यरत असतात.त्याच रुग्णवाहिका नादुरुस्त झाल्यास आजारी रुग्णांनी जावे कोणाकडे?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.याच सोनपेठमधील रुग्णांच्या जीविताशी खेळण्याचा केविलवाणा प्रयत्न १०८ या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून चालू असून जिल्हा शल्यचिकित्सक यांचे नियंत्रण असणाऱ्या १०८ या रुग्णवाहिकांचा कारभार सुधारण्याची मागणी केली जात आहे.

सोनपेठ शहरात तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुभाष पवार,वैद्यकीय अधिकारी डॉ.विष्णू राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य यंत्रणा उत्कृष्ट काम करत असताना रुग्णवाहिकेच्या नादुरुस्तपणामुळे मात्र चांगल्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची नाचक्की होत आहे.याच नादुरुस्त रुग्णवाहिकेचा प्रत्यय नुकताच सोनपेठमधील गंभीर आजारी रुग्णाच्या नातेवाईकांना आला.आणि त्यात आजारी असणारे बालक केवळ रुग्णवाहिकेच्या रस्त्यात बंद पडल्यामुळे दगावले आहे.याबाबत अधिक माहिती अशी.सहावर्षीय अश्फाक अहेमद सय्यद या बालकास सोनपेठ शहरातील त्याच्या राहत्या घरी सैलानी नगर सोनखेड(सोनपेठ) येथे २८ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता सर्पदंश झाला होता.सोनपेठ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याच्यावर रात्री १ वाजता उपचार करण्यात आले त्यानंतर सदर रुग्ण असणाऱ्या बालकाला अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारास दाखल करण्याचा सूचना सोनपेठ येथील डॉक्टरांनी दिल्या त्यानंतर बि.व्ही.जी.माध्यमातून कार्यरत असणाऱ्या १०८ या रुग्णवाहीने सदर बालकास अंबाजोगाई येथे नेण्यात येत असताना मांडखेल घाटात सदरची रुग्णवाहिका बंद पडली एवढ्या रात्री रस्त्यावर अडकून पडलेल्या रुग्णास व त्याच्या नातेवाईकास दुसऱ्या वाहनांची वाट पहावी लागली.

त्यानंतर तब्बल एका तासानंतर अंबाजोगाईकडे दूध घेऊन अँटो आला तेव्हा मात्र त्या बालकास रुग्णालयात दाखल करण्यासाठी उशीर झाल्याने बालकाने रस्त्यातच प्राण सोडले रुग्णालयात दाखल करताच रुग्णांनी त्यास मृत घोषित केले.दरम्यान मयत बालकाच्या कुटुंबीयांनी दोषी असणाऱ्या बि.व्ही.जी.या कंपनीसह सोनपेठला बंद नेहमी नादुरुस्त असणारी रुग्णवाहिका पाठवणाऱ्या यंत्रणेविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.