परभणीत थंडीचा जोर वाढला.

1 min read

परभणीत थंडीचा जोर वाढला.

8 अंश सेिल्सअसची नोंद

विजय कुलकर्णी/परभणी : शहर व परिसरात थंडीचा कडाका चांगलाच वाढू लागला आहे. बुधवारी दि. 11 रोजी कमाल 8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद घेण्यात आल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाड़ा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने दिली.
या महिन्याच्या सुरवातीपासुन तापमानात मोठी घट होऊ लागली आहे. मंगळवारी 8 अंशावर तापमान आले होते. गुरुवार दि. 5 रोजी 11.8 तर शुक्रवार दि.6 रोजी 11 अंश सेल्सीअस इतके तापमान नोंदले गेले, शनिवारी हे तापमान 12.6, रविवारी 11.4, सोमवारी 8.8, मंगळवारी 8.5 तर बुधवारी पहाटे 8 अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले.
दरम्यान, अचानक थंडी सुरु झाल्याने पहाटे फिरणाऱ्यांच्या संख्येत हळूहळू वाढ होऊ लागली आहे. कृषी विद्यापीठात पहाटेपासुन 'मॉर्निंग वॉक' साठी तरुणांसह वृद्धांचीही गर्दी होऊ लागली आहे. विशेषतः बाजारपेठेत थंडीपासुन बचाव करण्यासाठी ऊबदार कपड्यांच्या दुकानातही गर्दी वाढली आहे.