कारवाईसाठी जिल्हाधिकारीच उतरले रस्त्यावर

जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी स्वतः रस्त्यावर उतरुन दंडात्मक कारवाईचे सत्र सुरू केले...

कारवाईसाठी जिल्हाधिकारीच उतरले रस्त्यावर

परभणी : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत वारंवार सूचना दिल्या आहेत. त्यानंतरही नागरीकांमध्ये फरक पडलेला दिसत नाही. नागरीकांसोबतच व्यापारीही या नियमांची पायमल्ली करताना दिसत आहेत.आज जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी स्वतः रस्त्यावर उतरुन दंडात्मक कारवाईचे सत्र सुरू केले.

उपविभागीय अधिकारी संजय कुंडेटकर यांच्यासह महापालिकेचे पथक सकाळपासून बाजारपेठांमधुन फेरफटका मारुन कारवाई करत होते. त्यानंतर जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर स्वतः रस्त्यावर उतरले. शहरातील आरआर टॉवर, गांधीपार्क, गुजरी बाजार, शिवाजी चौक, सुभाष रोड या भागात पायी फेरफटका मारत जिल्हाधिका-यांसह पथकाने काही वाहनधारकांना समज दिली. काहींना दंड ठोठावला. व्यापा-यांना कठोर शब्दात मास्क वापरण्यासह सॅनिटायझरची व्यवस्था करा, सोशल डिस्टंसिंग पाळा, असे सुनावले.

जिल्हाधिकारी स्वतःच फिरत असल्याने बाजारात मोठी खळबळ उडाली. पथकाच्या धास्तीने व्यापा-यांनी वाहनधारकांनी पटापट मास्क तोंडावर चढवले. तसेच दुकानांमधून सॅनिटायझरच्या बाटल्या काऊंटवर ठेवल्या, गर्दीची ठिकाणे या कारवाई पाठोपाठ ओस पडलेली दिसुन आली.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.