पदवीधर मतदानासाठीच्या मतपेट्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

1 min read

पदवीधर मतदानासाठीच्या मतपेट्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

यावेळी जिल्हाधिकारी यांनी मतपेटयांची सुरक्षा आणि इतर बाबींची पाहणी करून मतदान केंद्रनिहाय मतपेट्या विहीत वेळेत संबंधितांना वाटप करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून निवडणूक कार्यक्रमानुसार दि. १ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ८;०० ते सायंकाळी ५:०० या कालावधीत मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने या निवडणुकीत मतदान करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी मतपेट्यांची पाहणी जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी केली.
किलेअर्क येथील शासकीय कला महाविद्यालय येथे मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या मतपेट्यांची पाहणी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली. यावेळी त्यांच्या सोबत अपर जिल्हाधिकारी डॉ अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी माधव निलावाड यांच्या सह इतर संबंधित उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी मतपेटयांची सुरक्षा आणि इतर बाबींची पाहणी करून मतदान केंद्रनिहाय मतपेट्या विहीत वेळेत संबंधितांना वाटप करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.