मालोजीराजेंच्या गढीची आणि शहाजीराजे यांच्या स्मारकाची जिल्हाधिका-यांनी केली पाहणी.

1 min read

मालोजीराजेंच्या गढीची आणि शहाजीराजे यांच्या स्मारकाची जिल्हाधिका-यांनी केली पाहणी.

इतिहासाचा ठेवा जनतेला खुला करून द्यावा.

सुमित दंडुके/औरंगाबाद : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काल मालोजीराजे यांच्या गढीचे आणि शहाजीराजे यांच्या वेरूळ येथील स्मारक स्थळाची पाहणी केली.
WhatsApp-Image-2020-11-04-at-1.11.22-PM
मालोजी राजे यांच्या गढीचे जतन आणि शहाजी राजे स्मारकाची पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधित विभागाला सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. यावेळी पर्यटन स्थळाचा विकास करून लवकरात लवकर जनतेला इतिहासाचा ठेवा पाहण्यासाठी खुला करून द्यावा यासाठी वीज, पाणी तसेच इतर सुविधा उपलब्ध करून दिल्यास जास्तीत जास्त पर्यटक या गढी आणि स्मारकास भेट देतील यासाठी परिपूर्ण पर्यटन आराखडा तयार करण्याबाबतचे निवेदन वेरुळ ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना दिले.