गलिच्छ राजकारणाचा कळस, नूतन जिल्हाधिकार्यांना पदभार नाकारला

परभणीचे गलिच्छ राजकारण पून्हा एकदा चव्हाट्यावर

गलिच्छ राजकारणाचा कळस, नूतन जिल्हाधिकार्यांना पदभार नाकारला

परभणी : परभणीचे विद्यमान जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर हे १ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत आहेत. तत्पूर्वी राज्य शासनाच्या वतीने जिल्हाधिकारी म्हणून आंचल गोयल यांची नियुक्ती करण्यात आली होती. नियुक्तीचे आदेशही देण्यात आले होते. त्यानुसार नुकतन जिल्हाधिकारी गोयल या चार दिवसांपूर्वीच परभणीत दाखल झाल्या होत्या. आज दुपारी त्या पदभार स्वीकारणार होत्या. तत्पुर्वी, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी शासन दरबारी वजन वापरून नूतन जिल्हाधिकाNयांना पदभार स्वीकारण्यापासून परावृत्त केले. प्रशासन आणि राजकारण या द्वंद्वामध्ये राजकारणाची सरशी झाली असून या निमित्ताने परभणीचे गलिच्छ राजकारण पून्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे पहायला मिळाले.

लोकप्रतिनिधींनी सरकार दरबारी प्रतिष्ठा पणाला लावून जिल्हाधिकारी यांनी पदभार स्वीकारू नये, यासाठी मोर्चे बांधणी केली. शनिवारी सकाळपासूनच जिल्ह्यातील नेते यासाठी प्रयत्नात होते. दुपारपर्यंतही गोयल यांनी पदभार स्वीकारला नव्हता. विशेष म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री नवाबमलिक जिल्ह्यात उपस्थित असताना हे कारस्थान सुरु होते. याबाबत माध्यमांनी पालकमंत्र्यांना विचारणा केली असता, त्यांनीही समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.

अखेर पदभार काटकर यांच्याकडे
नूतन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या ऐवेजी अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर यांनी शनिवारी सांयकाळच्या सुमारास जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी निरोप देण्यात आला. जिल्हाधिकरी आंचल गोयल यांच्या ऐवजी कनिष्ठ अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारावा असा राज्य शासनाच्या वतीने आदेशही येऊन धडकला होता. त्यानुसार मावळते जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी राजेश काटकर यांच्याकडे पदभार सूपुर्द केला. आयएएस अधिकारी असतानाही कनिष्ठ अधिकाNयांनी पदभार स्वीकारल्याने प्रशासकीय स्तरावरही मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.