बिदर (एम.एस. हुलसूरकर) : भालकी तालुक्यातील बोळेगांवकडे जाणारा तरुण सायगावजवळ नदीच्या पुलावरुन वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्याने मोटार सायकलसह वाहून जाण्याची दुर्घटना दि. १५ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली.
मयत तरुणाचे नाव मनोज बिरादार (वय ३५) असून त्याचा मृतदेह आज ( दि. १६) रोजी नदीच्या पुलापासून २०० मिटर अंतरावर शेतात सापडला. रात्री परिसरात मोठा पाऊस झाल्याने नदी-नाले दुथडी भरून वाहत होती. नदी ओलांडून जाताना पाण्याचा अंदाज आला नाही, त्यामुळे ही दुर्घटना घडली. घटनास्थळास भालकीचे तहसीलदार आण्णाराव पाटील, नायब तहसीलदार संजुकुमार सज्जणशेट्टी, पोलीस उपनिरीक्षक काशिनाथ रोळा यांनी भेट देऊन पंचनामा केला.
ओढ्याच्या पाण्यात वाहुन गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू.
नदीच्या पुलापासून २०० मिटर अंतरावर शेतात सापडला मृतदेह. रात्री परिसरात मोठा पाऊस झाल्याने नदी-नाले दुथडी वाहत होती.

Loading...