वीज कोसळून महिलेसह, एका युवकाचा आणि दोन गायींचा दुर्दैवी मृत्यू

1 min read

वीज कोसळून महिलेसह, एका युवकाचा आणि दोन गायींचा दुर्दैवी मृत्यू

सिल्लोड तालुक्यातील पळशी येथील घटना.राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून माहिलेच्या कुंटुबाचे सांत्वन.

सुमित दंडुके/औरंगाबाद: सिल्लोड तालुक्यातील पळशी आणि परिसरात रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला यावेळी चार ठिकाणी विज पडल्याची घटना घडली. यात दोघांचा मृत्यू झाला, तर दोन गायी दगावल्या. यात पळशी येथे विज पडून शेतात काम करणाऱ्या ४२ वर्षीय महिलेचा, तर खातखेडा येथे मजुरीसाठी आलेल्या मध्य प्रदेश येथील एका २० वर्षीय तरुणाचा समावेश आहे.
कांताबाई गंगाधर सोनवणे (४२, रा.पळशी) व सोविन दिनेश जामरे (२०, रा.डोंगर चिंचोली,जि.खरगोन मध्य प्रदेश) असे वीज पडून मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत.

** दोन गायी दगावल्या**
 पळशी येथे पूर्णानदीजवळ वीज पडली यात अल्पभूधारक शेतकरी गणेश बळे या शेतकऱ्याची गाय दगावली,दरम्यान  टाकळी खुर्द येथे ही गावाशेजारी विज पडली. यात परवेज ईसाक पठाण या शेतकऱ्याची गाय दगावली. सध्या ग्रामीण भागात कापूस वेचणीचे तसेच रबी पेरणीची लगभग सुरु आहे. यामुळे शेतकरी, शेतमजुर तसेच शाळा बंद असल्याने विद्यार्थी ही कापूस वेचणीचे काम करीत आहे. त्यात एकाच दिवशी परिसरात चार ठिकाणी विज पडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
WhatsApp-Image-2020-10-19-at-1.36.34-PM--1-
** राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून माहिलेच्या कुंटुबाचे सांत्वन.**

महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा तालुक्याचे आमदार अब्दुल सत्तार यांनी पळशी येथील सोनवणे कुंटुबाची भेट घेतली आणि सांत्वन केले, या घटनेने मी खुप दुःखी आहे व मी तुमच्या दुःखात सहभागी आहे तसेच शासनाकडून योग्य ती मदत मिळवून देऊ असे आश्वासन यावेळी अब्दुल सत्तार यांनी केले