धावत्या बेस्ट बसमध्ये चालकाला ह्रदयविकाराचा झटका, बस घुसली दुकानात

1 min read

धावत्या बेस्ट बसमध्ये चालकाला ह्रदयविकाराचा झटका, बस घुसली दुकानात

चेंबूर पोलीस स्टेशन समोर बसंत पार्क इथं आज सकाळी 10.45 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

मुंबई प्रतिनिधी - नेहा राऊळ : मुंबईमध्ये चेंबूर परिसरात धावत्या बेस्टला अपघात झाला आहे. बस चालकाला ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे ही घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.आज सकाळी 10.45 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. बेस्ट बस क्रमांक 381 ही घाटकोपर स्थानक पूर्वापासून चेंबूरच्या टाटा वीज केंद्राकडे जात होती. बसमध्ये 10 ते 12 प्रवासी प्रवास करत होते.

चेंबूर पोलीस स्टेशन समोर बसंत पार्क इथं बस पोहोचल्यानंतर बसचालक हरिदास पाटील यांना अचानक  हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे पाटील यांच्या गाडीवरचा ताबा सुटला.बसवरील ताबा  भाजीच्या दुकानात घुसली. बसचा वेग जास्त असल्यामुळे पुढे जाऊ ती थेट सिग्नलवर जाऊन आदळली. या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला होता. बस आदळल्यानंतर प्रवाशांनी तात्काळ बसमधून बाहेर उड्या टाकल्या.

बसचालक पाटील यांच्याकडे जाऊन पाहिले असता ते बेशुद्ध अवस्थेत आढळून होते. त्यांना तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. बेस्टच्या कर्मचाऱ्याने घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त बाजूला हटवली आहे.