शेतकरी पुत्राने घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट

1 min read

शेतकरी पुत्राने घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट

राजभवनातील राज्यपालांच्या निवासस्थानी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ४० मिनीटांचा दिला वेळ.

अहमदनगर- शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी यांना श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैरी येथील तरुण शेतकरी संतोष पाराजी भागडे यांनी भेटीसाठी वेळ मागितली होती. त्याची दखल घेऊन राज्यपाल महोदयांनी त्यांना 3 ऑक्टोबर 2020 सकाळी 11:30 वाजता भेटीचे निमंत्रण दिले व त्यानुसार राजभवनातील राज्यपालांच्या निवासस्थानी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ४० मिनीटांचा वेळ दिला होता.

सध्या राज्यातील शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या सर्व समस्यांवर राज्यपाल महोदयांबरोबर सविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांचे दुःख भागडे यांनी त्यांच्या कानावर घातले. तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाय योजना कराव्यात यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशी मागणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भागडे यांनी केली. राज्यपाल हे राज्याचे संविधानात्मक प्रमुख तसेच केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यामधील दुवा असल्याने निश्चितच बळीराजाचे दुःख समजून घेऊन त्यांच्याकडून शेतकऱ्यांना नक्की न्याय मिळणार आहे, असे संतोष भागडे यांनी व्यक्त केले.