शेतक-यांचा आडमूठपणा चक्क रस्ताच केला गायब

आ.अभिमन्यु पवार यांच्या मतदार संघातील घटना... 14 शेतकऱ्यांनी मिळून शेतरस्ताच केला गायब, प्रशासनाचा उदासीनपणा, ऊस न्यायला रस्ता नसल्याने शेतकरी अडचणीत

शेतक-यांचा आडमूठपणा चक्क रस्ताच केला गायब

निलंगा: कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी यामुळे शेतकरी हतबल झाल्याचं अनेकदा पाहिलं आहे. पण केवळ आडमूठेपणामुळं कष्ट करून सुद्धा नुकसान सोसण्याची वेळ एका शेतकऱ्यावर आली आहे. शेतक-याचा वैरी शेतकरीच असाच काहीसा प्रकार लातूरच्या निलंगा तालुक्यातील भुतमुगळी येथे उघडकीस आला आहे. हेच गाव औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या मतदारसंघात येते. ज्यांनी नुकतेच मतदारसंघात मागेल त्या शेतकऱ्यांना शेतरस्ता करून देण्याच्या योजनेचा शुभारंभ केला होता. मात्र येथील शेतकरी गुणवंत रामतीर्थ यांच्या शेताला असणारा शेतरस्ताच चक्क 14 शेतक-यांनी मिळून गायब केला असल्याची माहिती शेतकरी रामतीर्थ यांनी एनालायझरशी बोलताना दिली.

एका शेतक-यांने तर चक्क शेड मारून गोठा तयार केल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यावर 14 शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने तळहातावर जपलेला ऊस आता वाळून जात आहे. कारण उसाला तोडण्यासाठी आलेली टोळी वाटे अभावी परत निघून गेली.

किमान 2 लाख रुपयांचे नुकसान डोळ्यादेखत पाहण्याची वेळ शेतक-यावर आली आहे. रामतीर्थ यांच्या शेता शेजारील 14 शेतकऱ्यांनी नकाशावर असलेला शिव व शेत रस्त्यावर अतिक्रमण केल्याने आता वाट बंद झाली आहे. यासाठी गुणवंत रामतीर्थ यांनी तहसील कार्यालय पोलीस ठाण्याच्या चकरा मारून चपला झिजवल्या पण यावर प्रशासनाची उदासीनता यामुळे रामतीर्थ यांना आजपर्यंत न्याय मिळाला नाही. याउलट त्यांच्या मुलावर हल्ला केला गेला, हतबल झालेले रामतीर्थ कुटुंबाना आता डोळ्यासमोर ऊस वाळताना बघत बसण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

जगण्याचं साधन असलेल्या शेतात अडीच एकर ऊस जोपासला पण धनदांडग्या शेजारच्या 14 शेतकऱ्यांने शासकीय शेत रस्त्यावर अतिक्रमण केल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. सतत निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांला शासकीय अधिकारी दाद देऊन शेत रस्त्यावरील अतिक्रमण मुक्त केल्यास नक्कीच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. आ.अभिमन्यु पवार यांनी औसा मतदार संघात मागेल त्या शेतकऱ्यांना शेतरस्ता करून देण्याच्या योजनेचा शुभारंभ मागील आठवड्यात केला मात्र असे अतिक्रमण करून रस्ते गायब केलेल्या लोकांवर काय कारवाई करणार असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.