वडील पट्टा लावून आडवे झालेत मुलगा परदेशात सेट झाला- निलेश राणे

निलेश राणेंची मंत्री आदित्य ठाकरेंवर टिका

वडील पट्टा लावून आडवे झालेत मुलगा परदेशात सेट झाला- निलेश राणे

मुंबई : मानेच्या दुखण्यावरील उपचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे एच.एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले होते.बुधवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून मुख्यमंत्री ठाकरेंवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. यावरुन भाजपचे नेते निलेश राणे यांनी ट्विटवरुन ठाकरे आणि पवार कुटुंबावार जोरदार निशाणा साधला आहे.

भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट मध्ये म्हटलं की, वडील पट्टा लावून आडवे झालेत मुलगा परदेशात सेट झाला आहे. वरुण सरदेसाई ला भांडी घासायला नेला आहे का? त्याचं काय काम? मोदी साहेब पंतप्रधान असून शासकीय दौरे २ ते ३ दिवसात आटपतात पण महाराष्ट्र कर्जबाजारी असून सुद्धा याचे दौरे संपत नाही, जनतेचा पैसा आहे तो ठाकरे पवार कुटुंबाचा नाही. असं म्हणत निलेश राणेंनी आदित्य ठाकरेच्या दौऱ्यावर जोरदार टीका केली आहे.

दरम्यान, नारायण राणे व त्यांचे दो्न्ही पुत्र नितेश, निलेश राणे यांनी गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेवरील हल्ले तीव्र केले आहेत. त्यातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सातत्याने लक्ष्य करण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेना नेते आणि राणे कुटुंबातील सदस्यांमध्ये गेले काही दिवस सातत्याने खटके उडत आहेत. कधी सोशल मीडियातून तर कधी भाषणांतून एकमेकांवर चिखलफेक केली जात आहे. आदित्य ठाकरेंचा परदेश दौरा आणि मुख्यमंत्र्यांची झालेली शस्त्रक्रिया यावरुन निलेश राणेंनी ठाकरे कुटुंबावर जोरदार टीका केली आहे. आता या टीकेला शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया दिली जाणार हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...

Related Articles

You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.