लुडोसाठी बापालाच खेचले कोर्टात

1 min read

लुडोसाठी बापालाच खेचले कोर्टात

आजकाल आपण मुलांमध्ये जिंकण्याची अशी सवय लावली आहे की, त्यांना पराभव सहन करणे अशक्य झाले आहे, त्यांना सांगणे आवश्यक आहे की, प्रत्येक वेळी जिंकणे गरजचे नसते.

खेळ कोणताही असो खेळात हार जीत ठरलेलीच असते. पण याच हार जीत मुळे एक मुलगी वडिलांच्या विरोधात फॅमिली कोर्टात गेली आहे. काय आहे हे प्रकरण?
कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे, लुडो गेम पुन्हा एकदा प्रत्येक घरात लोकप्रिय खेळ बनला. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन मोठ्या आवडीने खेळायला लागले.पण हाच खेळ वडिल आणि मुलीचे नाते तोडणारा खेळ ठरला. हे कसं शक्य आहे? कारण बातमीच तशी आहे.

आत्तापर्यंत, क्रीडा हा लोकांशी संपर्क साधण्याचा, एकत्र येण्याचा आणि संबंध जोडण्याचा एक मार्ग मानला जात होता, परंतु बदलत्या काळात हार आणि जीत मुळे हे संबंध खराब होत आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्येही असाच एक प्रकार समोर आला आहे, ज्यात एका 24 वर्षांच्या मुलीला लुडो मध्ये वडिलांनी पराभूत केल्यामुळे तिचे वडील खरे नाहीत असा संशय घेत ती फॅमिली समुपदेशन केंद्रापर्यंत पोहचली.

भोपाळमध्ये राहणारी 24 वर्षांची मुलगी वडील आणि भावंडांसह लुडो खेळत होती. खेळामध्ये जेव्हा वडिलांनी मुलीला आउट केले. तेव्हा मुलीच्या मनात इतकी चिड आली ती वडिल-मुलीचे नाते संपविण्याचा विचार करू लागली. ती वडिलांचा तिरस्कार करू लागली. खेळानंतर मुलीचा तिच्या वडिला विषयी इतका द्वेष वाढला की, हे प्रकरण फॅमिली समुपदेशन केंद्रापर्यंत पोहोचले.

कौटुंबिक कोर्टाच्या सल्लागार सरिता रजनी म्हणाल्या की, पूर्वी एक 24 वर्षांची मुलगी आमच्याकडे आली होत. जिने सांगितले की जेव्हा ती आपल्या भावंड व वडिलांसोबत लुडो खेळत होती तेव्हा वडिलांनी तिला त्या खेळा दरम्यान पराभूत केले. यानंतर त्ला असे वाटू लागले की वडील आणि तिचे नाते संपले.
मुलगी म्हणली की, मला माझ्या वडिलांना वडील म्हणायला देखील आवडत नाही. या विचित्र प्रकरणाबद्दल समुपदेशक सरिता सांगतात की, मुलीचे चार वेळा समुपदेशन झाले आहे, ज्यात थोडा सुधार झाला आहे.

कौटुंबिक कोर्टाच्या सल्लागार सरिता सांगतात की, आजकाल आपण मुलांमध्ये जिंकण्याची अशी सवय लावली आहे की, त्यांना पराभव सहन करणे अशक्य झाले आहे, त्यांना सांगणे आवश्यक आहे की, प्रत्येक वेळी जिंकणे गरजचे नसते. लॉकडाऊनमुळे यासारखे खटले समोर येत आहेत.