तब्बल १८८ दिवसानंतर ताजमहलमध्ये पहिला प्रवेश, ते पण चीनचा...

1 min read

तब्बल १८८ दिवसानंतर ताजमहलमध्ये पहिला प्रवेश, ते पण चीनचा...

काल जगातील सातवे आश्चर्य असलेले, आग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहल तब्बल १८८ दिवसांनंतर पर्यटनासाठी सुरु करण्यात आले. ताजमहल खुले होताच त्यात पहिला प्रवेश एका चीनी पर्यटकाने केला आहे.

आग्रा: कोरोना महामारीमुळे भारतात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले होते. यामुळे भारतातील सगळीच पर्यटन स्थळे बंद करण्यात आली होती. आता ३ ते ४ महिन्यांच्या विश्रांती पुन्हा मिशन बिगीन अगेन अंतर्गत सर्व हळूहळू पुर्वपदावर येत आहे. तसेच पर्यटन स्थळे खुले होत आहेत. काल जगातील सातवे आश्चर्य असलेले, आग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहल तब्बल १८८ दिवसांनंतर पर्यटनासाठी सुरु करण्यात आले. ताजमहल खुले होताच त्यात पहिला प्रवेश एका चीनी पर्यटकाने केला आहे. ज्यादेशामुळे सगळीकडे कोरोना पसरला त्याच देशाच्या नागरिकाने ताजमहलमध्ये पहिला प्रवेश केला. हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच पर्यटक काल दिवसभरात ताजमहल पाहण्यासाठी आले होते. सध्या तिकीट खिडकी बंद आहे. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने तिकीट बुकींग केली जात आहे. तसेच कोरोना संबंधित सर्व नियमांचे सोशल डिस्टनसिंग,मास्क आदींचे पालन केले जात आहे.