देशाच्या चार राज्यांत आणि एका केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोगाने आज जाहीर केल्या आहेत. त्याअंतर्गत 27 मार्च रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. निवडणुका कशा आयोजित केल्या जातील आणि कोणती व्यवस्था असेल याची सर्व माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात निवडणुका घेण्यात येतील, राज्याचा पहिला टप्पा 2 मार्चला आणि आठवा टप्पा 2 एप्रिलला असेल.
आसाममधील 126 जागांसाठी, तामिळनाडूमध्ये 244 जागा, पश्चिम बंगालमध्ये 294 जागा, केरळमधील 140 आणि पुद्दुचेरीच्या 30 जागांसाठी निवडणुका पार पडतील. केरळ विधानसभा निवडणुकीसाठी 6 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. आसाममध्ये 27 मार्च, १ आणि 6 एप्रिल रोजी विधानसभा निवडणुका तीन टप्प्यात पार पडणार आहेत. पाचही विधानसभा निवडणुकांची मतमोजणी 2 मे रोजी होणार आहे. ही भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांची शेवटची निवडणूक असेल कारण अरोरा हे 13 एप्रिलला सेवानिवृत्त होणार आहेत.
अशी असेल व्यवस्था असतील
1) पोस्टल मतदान सुविधा पर्यायी असेल.
2) बंगालमध्ये एक लाखाहून अधिक मतदान केंद्रे असतील.
3) ड्युटीवर जाण्यापूर्वी सर्व निवडणूक अधिका-यांना कोविडची लस दिली जाईल.
4) सुरक्षा निधी ऑनलाइन जमा होईल.
5) मतदानाची वेळ एक तासाने वाढविण्यात आली आहे.
6) सर्व मतदान केंद्रे तळ मजल्यावर बांधली जातील.
7) बंगालसह सर्व निवडणूक राज्यांत केंद्रीय राखीव पोलिस दल तैनात केले जाईल.
8) प्रचारासाठी जास्तीत जास्त पाच लोक घरोघरी जाण्यास सक्षम असतील.
9) नामांकन ऑनलाईन असेल.
10) एका केंद्रामध्ये एक हजाराहून अधिक मतदार नसतील.
11) ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांना पोस्टलद्वारे मतदान करण्याचा पर्याय असेल.
12) निवडणुकीशी संबंधित माहितीसाठी टोल फ्री क्रमांक 1950 देण्यात आला.
13) निवडणुक वेळापत्रक जाहीर करण्याबरोबरच निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू आहे.
14) बंगालमध्ये एक लाख एक हजार 916 मतदान केंद्रे उभारली जातील.
15) राज्य पोलिस दले केंद्रीय दलांसोबत काम करतील.
16) प्रत्येक मतदान केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
असा असेल मतदानाचा कार्यक्रम?
- पश्चिम बंगालच्या निवडणुका आठ टप्प्यात होणार आहेत.
- राज्याचा पहिला टप्पा 27 मार्चला आणि आठवा टप्पा 29 एप्रिलला आहे.
- केरळ विधानसभा निवडणुकीसाठी 6 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
- आसाममधील विधानसभा निवडणुका 27 मार्च, १ एप्रिल आणि 6 एप्रिल रोजी तीन टप्प्यात होतील.
- पुद्दुचेरीचे मतदान 6 एप्रिल रोजी पार पडणार नाही.
पाचही विधानसभा निवडणुकांसाठी मतमोजणी 2 मे रोजी होईल. तर ही निवडणूक माझ्या कार्यकाळातील शेवटची असेल अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषदेत दिली.