गॅस स्फोटात जीव वाचला, पण संसार मात्र उध्वस्त झाला.

1 min read

गॅस स्फोटात जीव वाचला, पण संसार मात्र उध्वस्त झाला.

घरगुती गॅसचा स्फोट, ३५ क्विंटल कापूस जळून खाक

सिद्धेश्वर गिरी/परभणी : जिल्ह्यातील वडगाव येथील शेतकरी ज्ञानोबा बांगे हे सहकुटुंब घरात झोपले असताना त्यांच्या घरातील गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. सुदैवाने याची कल्पना ज्ञानोबा बांगे यांना आल्याने त्यांनी वेळीच परिवारातील सदस्यांना घराबाहेर काढले यामुळे जिवीतहानी टळली.
मात्र या दुर्घटनेत त्यांच्या एका बैलाला मोठी दुखापत झाली. तसेच घरात असलेले ७ ग्रॅमचे दागिने आणि ३५ क्विंटल कापसासह इतर संसारउपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेने संपूर्ण कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. एक एक पाई जमा करून उभा केलेला संसार असा काही क्षणात भस्मसात झाल्याचे पाहुन बांगे कुटुंबाला अश्रु अनावर झाले. आता या संकटात मदत करणार तरी कोण असाच प्रश्न या कुटुंबासमोर आता उभा राहीला आहे.