जन्मदात्या पित्यानेच केेला मुलीवर बलात्कार.

1 min read

जन्मदात्या पित्यानेच केेला मुलीवर बलात्कार.

माणुसकीला काळीमा फासणारी घटना

हुलसूर/महेश हुलसूरकर: हुलसूर तालुक्यातील बेलुर येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. जन्मदात्या पित्यानेच पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याली घटना समोर आली आहे.
पोलीस सुत्रांकडून माहिती अशी कीू, मोलमजुरी साठी मुळ गाव सकोळ जवळगा येथून बेलुर येथे खूप वर्षांपासून वासतव्यास हे दाम्पत्य होते. तीन महिन्याखाली नागनाथ माधव पाटोळे वय ३८ हा ११ वर्षीय स्वतःच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे . दि.२३ आक्टोबंर रोजी मुलीची आई सुषमा नागनाथ पाटोळे यांनी पती विरुद्ध तक्रार दाखल केली आहे . त्यांच्यावर कलम ३७६ हुलसूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लगेच हुलसूर चे पीएसआय यांनी आरोपीला अटक केेली आहे.