मंदिर पाडण्यास विरोध करणाऱ्या मुलीस मारहाण करून विनयभंग

कोपरा-किनगावच्या सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकाविरुध्द गुन्हा दाखल...

मंदिर पाडण्यास विरोध करणाऱ्या मुलीस मारहाण करून विनयभंग

अहमदपूर : कोपरा किनगाव येथील अतिक्रमित भागातील भवानी मातेचे मंदिर पाडण्यास गेलेल्या लोकांनी विरोध करणाऱ्या तरुणीस विनयभंग करत बेदम मारहाण केल्याची घटना घडली.१६ लोकाविरोधात किनगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील कोपरा किनगाव येथे भवानी मातेचे मंदिर आहे. गावातील सरपंच आणि इतर लोकांकडून ते मंदिर काढण्यासाठी प्रयास सुरू होते. कारण हे मंदिर अतिक्रमित जागेवर असल्याचे सांगण्यात आले. १२ मार्च रोजी सरपंच गंगाधर डेपे आणि इतर १५ लोक जेसीबी घेऊन जागा साफ करत होते. त्यावेळी फिर्यादी महिलेने 'पाड कामाचे आदेश आहेत का ?' असा प्रश्न करत मंदिर पाडकामास विरोध केला. यावरून संतप्त झालेल्या लोकांनी काठीने सदरील महिलेस जबर मारहाण केली. या भांडणात काही महिला ही सामील होत्या. फिर्यादी महिलेस चावण्यात आले. सदर मारहाणीत फिर्यादी महिलेच्या गुप्तांगावर दगडाने मारहाण केल्यामुळे महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर पीडित महिलेने किनगाव पोलिसात तकार दिली आहे.

यावरून सरपंच गंगाधर डेपे, उपसरपंच बालाजी आचार्य, ग्रामसेवक, प्रशांत आचार्य, कांचन आचार्य, राहूल कांबळे, गहिनीनाथ आचार्य, सुभाष टेलर, मैनाबाई आचार्य, मैनाबाईचा मुलगा, शिला आचार्य, संतराम ग्रामपंचायत सेवक, भुराबाई आचार्य, शांताबाई आचार्य, सुभाष टेलरची बायको, जेसीबी ऑपरेटर यांच्यासह १६ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथे मुलीस मारहाण करून तिचा विनयभंग करण्यात आल्याप्रकरणी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्यांसह १६ जणांविरुध्द गुन्हा किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच घटनेत ग्रामसेवक रवींद्र क्षीरसागर यांच्या फिर्यादी वरून दोन महिला विरोधात जातीवाचक शिवीगाळ करुन शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यात आला आहे, अशी तक्रार देण्यात आली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.