सरकारला मदिरालय उघडी चालतात, मग मंदीर का नाही? मनसे आक्रमक

औरंगाबादमध्ये मनसेचे घंटानाद आंदोलन

सरकारला मदिरालय उघडी चालतात, मग मंदीर का नाही? मनसे आक्रमक

औरंगाबाद : राज्यातील मंदिरं उघडले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर आज औरंगाबाद शहरात आंदोलन करण्यात आले. शहरातील गुलमंडीवर असलेल्या सुपारी हनुमान मंदिरासमोर हे घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी मंदिरासमोर जमलेल्या शेकडो मनसे कार्यकर्त्यांनी घंटानाद करत आंदोलन केले. आंदोलनादरम्यान पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

मनसेचे राज्य उपाध्यक्ष सुमित खांबेकर म्हणाले की, राज्यात सर्वत्र हाॅटेल, बार राजकीय सभा, मेळावे आंदोलन,सुरु आहेत. त्यात ठिकाणी सरकराला गर्दी चालते मग हिंदु सण आणि मंदिर बंद का?असा सवाल खांबेकर यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी सरकरा विरोधात जोरदार घोषाणा बाजी केली.

आंदोलनावेळी मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे म्हणाले, राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर हे आंदोलन करण्यात आले. दरवेळी हिंदु सण आले की, कोरोनाचा प्रसार होतो का, असा सवाल दाशरथे यांनी उपस्थित केला. तसेच येत्या १५ दिवसांत राज्यातील मंदीर उघडण्याबाबत सरकारने जर निर्णय घेतला नाही तर.. मनसे अधिक तीव्र आंदोलन करले असा थेट इशारा मनसे महाविकास आघाडीला दिला आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.