राज्यपालांचा गृहमंत्र्यांना फोन,अर्णव गोस्वामींच्या आरोग्य व सुरक्षेबाबत चिंता.

1 min read

राज्यपालांचा गृहमंत्र्यांना फोन,अर्णव गोस्वामींच्या आरोग्य व सुरक्षेबाबत चिंता.

राज्यापालांची सुचना ,कुटुंबियांना भेटू देण्याची, तसेच त्यांच्याशी बोलण्याची परवानगी द्यावी.

मुंबई: राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन केला आणि अर्णव गोस्वामी यांची सुरक्षा आणि आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. अर्णव गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना सध्या तळोजा कारागृहात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या अटकेवरुन राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असे जोरदार राजकारण रंगलेले पाहायला मिळत आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज फोन केला. त्यावेळी अर्णव गोस्वामी यांची सुरक्षा आणि आरोग्याबाबत राज्यपालांनी चिंता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर गोस्वामी यांच्या कुटुंबियांना भेटू देण्याची, तसेच त्यांच्याशी बोलण्याची परवानगी द्यावी अशी सूचनाही राज्यपालांनी गृहमंत्र्यांना केली आहे. राज्यपालांनी यापूर्वीही देशमुख यांच्याकडे गोस्वामी यांच्या अटकेच्या पद्धतीवरुन नाराजी व्यक्त केली होती.