जिल्ह्यात कोरोनाची वाढ थांबेना; आज 379 बाधित

मंगळवार दि. 30 मार्च रोजी तब्बल 379 कोरोना रुग्णांची वाढ,नऊ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात कोरोनाची वाढ थांबेना; आज 379 बाधित

विजय कुलकर्णी/परभणी: जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवार दि. 30 मार्च रोजी तब्बल 379 कोरोना रुग्ण नव्याने आढळले असून नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दिवसभरात 215 कोरोनामुक्त रुग्णांना सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.रुग्णालयातील कक्षात दोन हजार 196 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 408 कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत 13 हजार 959 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी 11 हजार 355 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत.

रुग्णालयातर्फे आतापर्यंत 1 लाख 68 हजार 184 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात 1 लाख 53 हजार 644 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर 13 हजार 806 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह, 594 अनिर्णायक व 140 नमुने नाकारल्या गेले असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रसिध्द केलेल्या प्रेसनोटद्वारे कळविले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.