ऐतिहासिक दसरा महोत्सव इथे होणार रावण दहन.

1 min read

ऐतिहासिक दसरा महोत्सव इथे होणार रावण दहन.

मान्यवरांच्या हस्ते झाला बासा पूजनाचा कार्यक्रम, प्रसिद्ध रामलीला कर्यक्रम रद्द.

हिंगोली: कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली येथे भरणाऱ्या ऐतिहासिक दसरा महत्त्वाच्या बाबतीत जिल्हाधिकारी जयवंशी यांनी यापूर्वीच प्रदर्शनी रद्द केल्याचे जाहीर केले होते. परंतु नवरात्र महोत्सवानिमित्त होणारे सर्व धार्मिक कार्यक्रम शहरा जवळ असलेल्या खाकी बाबा मठ संस्थानमध्ये पार पडणार आहेत. त्यामुळे रावण दहनाचा कार्यक्रम रामलीला मैदानावर होणार नसून मठ परिसरात होणार आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत आज बासा पूजनाचा कार्यक्रम पार पडला.
बासा पूजनाचा कार्यक्रम
येथील सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने आज दिनांक 1 अक्टोबर रोजी शहरातील खाकी बाबा मठ येथे सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या बासा पुजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी खाकी बाबा मठ संस्थानचे महंत श्री कौशल्य दास महाराज यांच्या हस्ते बासा पूजन करण्यात आले. यावेळी आमदार तानाजीराव मुटकुळे, नगराध्यक्ष बाबारावजी बांगर, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार गजानन शिंदे, पंचायत समिती अध्यक्ष झुळझुळे, वकील संघाचे जिल्हाध्यक्ष शिंदे, श्याम खंडेलवाल, राजेंद्र हलवाई, श्याम शेवाळकर, बाबा घुगे, राजीव उपाध्ये, विलास गोरे, संजय ढोके, सु‌र्यकांत अण्णा गोटरे आदींची उपस्थिती होती.
WhatsApp-Image-2020-10-01-at-11.51.10-AM
या वर्षी विशेष म्हणजे दसऱ्यातील सर्वात महत्त्वाचे आकर्षण असलेल्या रावण दहनाचा कार्यक्रम खाकी बाबा मठ येथे होणार आहे. यावर्षी शहरातील रामलीला मैदानावर रामलीला होणार नसून खाकी बाबा मठ येथे दहा दिवस दसरा समितीचे कार्यक्रम होणार आहेत.तरी सर्व जनतेने याची नोंद घेऊन प्रशासनास व सार्वजनिक दसरा महोत्सव समिती सहकार्य करावे ‌असे आवाहन करण्यात आले आहे.