औरंगाबादेतील ऐतिहासिक दरवाजांचे होणार सुशोभीकरण.

1 min read

औरंगाबादेतील ऐतिहासिक दरवाजांचे होणार सुशोभीकरण.

शहरातील अनेक ऐतिहासिक दरवाजांची पडझड़ झाली आहे. तर काही दरवाजांचे मनपाने सुशोभीकरणही केले आहे. पडझड झालेल्यांपैकी नऊ दरवाजांचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

सुमित दंडुके/औरंगाबाद: गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील ऐतिहासिक दरवाजांचे वैभव हरवत चालले आहे. यासाठी महापालिकेने त्वरीत काही उपाययोजना कराव्या अश्या मागण्या अनेक स्तरातून होत होत्या. मात्र आता मनपा प्रशासन जागे झाले आहे. या ऐतिहासिक दरवाजांची डागडूजी करून संवर्धन करण्याचे काम मनपाने हाती घेतले आहे. शहरातील अनेक ऐतिहासिक दरवाजांची पडझड़ झाली आहे. तर काही दरवाजांचे मनपाने सुशोभीकरणही केले आहे. पडझड झालेल्यांपैकी नऊ दरवाजांचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. महापालिकेचे प्रशासक अस्तिककुमार पांडे यांनी हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे. तसेच काही ठिकाणी दरवाजांना अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. ही अतिक्रमणे हटवून दरवाजांचे सुशोभीकरण केले जाणार आहे. हे काम एप्रिल २०२१ पर्यंत पूर्ण होईल असे सांगण्यात आले आहे.
**या दरवाजांचा आहे समावेश **
कटकटगेट, नोबत दरवाजा, काला दरवाजा, जाफर गेट, बारापुल्ला गेट, रोशनगेट, पैठणगेट, खिजरी गेट आणि मेहमुद गेट.